Skip to main content

Posts

Showing posts from February, 2018

ते शेवटचे दिवस

आज class मध्ये बसून पण थोड एकट एकट वाटल. मुल थोडी कमीच होती, जी होती ती आपल्याच नादात होती पण मी तिथे एकटाच होतो. आज जाणवल , शेवटचा महिना, शेवटचे ३०-४० दिवस, college मधल्या त्या वातावरणात वेळ घालवायाची शेवटेची संधी. त्या बेंच वर बसून दंगा करायचे शेवटचे दिवस . कुठे कोणाशी झालेल भांडण मिटवायच असेल किंवा अबोला सोडायचा असेल तर शेवटचे सोनेरी दिवस.  मनात थोडी भीती वाटते आज... रोज सकाळी बस मध्ये बसून college च्या stop वर उतरायची सवय मोडावी लागणार काही दिवसात. Lecture तर दूर पण त्या बदाम चौकाततरी आपल्याला कोणी ओळखेल का? मित्रांना मुक्त पणे शिव्या देत फिरण्याचे दिवस संपणार.. lipton वर दर संध्याकाळी केलेला चहा- नाश्टा परत रोज नाही मिळणार. उमेश दादाशी गप्पा मारत घालवलेले दिवस college संपल्यावर पुन्हा कधी मिळणार ? ४:१५ नंतरची classtest आणि मध्येच मुसंडी मारणार्या midsem आपण परत कधीच नाही देणार.! Ground वरच्या बेंच वर बसून केलेला timepass परत नाहीच होणार! Lunch Break मध्ये डबा खाण्याचा बेत कदाचीत नाहीच करता येणार. नीरज्याच्या डब्यातील roll, वैभव च्या डब्यातल्या चपात्या, कुलदीप ची आवडती टोमॅट

Social Media