दुकानात फक्त Parle-G चा पुडा आणायला गेलेलो, आणि पावसाने अचानक जोर धरला. भिजत जाव की नको असा विचार मनात आला पण म्हणल की कधी एवढ पळत जायच! जरा कमी आला की जाऊया म्हणून तिथेच थांबलो. जवळच मुलींची शाळा असल्यामूळे दुकानात गिर्ह्राईकांच्या ऐवजी मुलींचीच गर्दी अधिक. बघितल तर ८-९वी तल्या मुली असाव्यात, एकीने दप्तरामधून एक मोठा मोबाइल बाहेर काढला तो मोबाईल बघून चाटच पडलो. एवढा ग्रज्युएट झालोय पण अजून एवढा भारीतला मोबाईल घ्यायच धाडस होत नाही माझ आणि ही मुलगी अगदी हसत खेळत मोबाईल वापरत होती. तेवढ्यात तीला कोणाचातरी call आला, "हो अरे भिजत नाहीये मी, दुकानात थांबले एका!" तिकडून कोणितरी तीला भिजू नको अस सांगत होत. मला वाटल भाऊ, वडील वगेरे वगैरे कोणितरी असेल. " नको दादा येणार आहे न्यायला, तु नको येऊ " (तिकडून येण्याबद्दल काहितरी बोलण झाल असाव) ही काहीतरी वेगळीच भानगड दिसते अस म्हणून मी त्या बोलण्याकडे सपशेल दुर्लक्ष करायला चालू केल! एखाद्याच्या personal गोष्टींशी आपल्याला काय करायच आहे. बाहेर पावसाचा तडाखा वाढतच होता, आणि मला शेजारी उभारलेल्या त्या मुलीच्या फोन वरच्या बोलण्याने अ...