Skip to main content

Posts

Showing posts from August, 2015

भारत कधी कधी माझा देश आहे.

भारत हा माझा देश आहे... भारत खरच माझा देश आहे ? हो, भारत माझाच देश आहे. १ली ते १०वी रोज शाळेत जी प्रतिज्ञा म्हणतो, त्याची सुरुवात हीच असते की भारत माझा देश आहे... पण आता ते वाक्य थोडासा बदलायला पाहिजे... भारत कधी कधी माझा देश आहे. बरोबर, मी भारतातच राहतो पण मग भारत हा कधी कधी माझा देश कसा काय ? ह्याच उत्तर खूपच साध आहे, आपल्या आजू बाजूला च आहे ह्याच उत्तर. कालच १५ ऑगस्ट होऊन गेला... कालच्या दिवशी तर भारत हा हमखास माझाच असतो आणि ह्या देशातला प्रत्येक “मी” भारताच गुणगान गात असतो. परंतू १६ ऑगस्ट पासून पुन्हा सगळे आपापल्या कामात व्यस्त होतात आणि पुन्हा भारत परका होतो. रोजच्या जीवनात कोणीही त्याचे (आपल्याच देशाचे) गुणगान करत नाही. फक्त त्याला शिव्याच मिळतात... “कसले हे रस्ते? रस्ते नव्हे खड्डेच... लोड शेडींग ची बोंब... पिण्याच्या पाण्याची ओरड... भ्रष्टाचाराचा भस्मासुर...” भारतातल्या प्रत्येक गावातून रोज आपल्याला हे असे तक्रारींचे सूर रोज नक्कीच न चुकता ऐकू येतात...तक्रारी तर असंख्य असतात पण त्या सोडवण्यात कोणाला रस नसतो... आपण प्रतिज्ञेत म्हणतो की भारत माझा देश

Social Media