Skip to main content

Posts

Showing posts from August, 2018

नीरज्या

मैत्री व्हायला फार काही लागत नाही फक्त एकदा भेट होण महत्वाच असत. मैत्री कामातून होते, वर्गातल्या एकाच बाकावर होते, दुपारच्या सुट्टीत खाल्लेल्या डब्यामुळे होते, ती अनपेक्षित असते म्हणून खुलते. मला आठवतय college सूरू झाल्यापासून पहिलच practical होत FEC ह्या विषयाच एका मित्राला विचारून मी एका building खाली उभा होतो, त्याच building मध्ये त्या विषयाची lab होती. तेवढ्यात तिथे वर्गातलाच पण एक अनोळखी मुलगा दिसला, माझ्याकडे पाहून हसला मग मीही त्याच्याशी बोलायला गेलो. त्याने विचारले, "डबा खाल्लास का?" अरे हो मी तर डबा खायचाच राहिलेलो; "चल खाउया", अस म्हणून तो मला ground वर घेऊनच गेला. त्याच्या सांगलीच्या मित्रांच्यासोबत डबा खायला. डबा खाऊन झाल्यावर confirm करण्यासाठी परत lab चा पत्ता विचारला आणि खरच ही त्याची आणि माझी पहिलीच भेट होती, तो मला lab पर्यंत सोडायला आला. तेव्हापासून आत्ता अगदी ५ मिनिटांपुर्वी पर्यंत आम्ही कायम सोबत असतो. college मध्ये तर काहीही काम असुदे आम्ही एकत्रच असायचो. FE मध्ये वर्गात झालेला पहिला मित्र म्हणजे नीरज. नीरज दाते, हुशार, खेळाडू वृत्तीचा आणि आप

Social Media