Skip to main content

Posts

Showing posts from November, 2015

ओळख

माझ्या उभ्या आयुष्यात कधी लेखन करेन असा वाटल नव्हत. म्हणजे लेखन भरपूर केलय, पण ते फक्त शाळेतच. शाळेच्या बाहेर पहिल्यांदा लिहील ते कॉलेज च्या वार्षिक नियतकालिकासाठी. त्या लेखनामुळे कौतुक झाल, मग ठरवल कि स्वतःचा ब्लॉग लिहायचा. सुरुवातीला नुसत ठरवलं पण कृती कोणतीच केली नाही नुसताच विचार करत राहिलो. अगदी भारताच्या संसंदेसारख म्हणजे एखाद्या विधेयकावर विचार करत बसायचं आणि जेव्हा वेळ निघू जाईल तेव्हा त्याला मान्यता द्यायची. म्हणजे मी खूपच उशिरा लिहितोय असा नाही पण माझ्या मते खूप लवकर लिहितोय असाही नाही. आधी तर ब्लॉग लिहायचा कसा ते सुद्धा मला माहीत नव्हतं मग google ची मदत घेऊन ते सुद्धा शिकलो. आणी तिसर्या सत्राच्या सुरुवातीला ब्लॉग लिहायला सुरुवात केली. कायमच काय लिहायचं हे सुचत नाही आणि मग सुरुवात केली की आपोआप सुचायला सुरुवात होते. आता हेच बघा ना.... आज लिहायला सुरुवात केली तेव्हा काय लिहायचं हे अजिबात माहीत नव्हत पण मग काहीतरी लिहायला सुरुवात केली आणि मग आता एक मोठा परिच्छेद तयार झालाय. सुरुवातीला ह्या आजच्या विषयाला दिलेल्या नावाबद्दल थोडा बोलूया...  “ओळख” थोडा उशीर झालाय ओ

An empty DRAFT

आज खूप दिवसांनी ब्लॉग उघडला.  settings चेक करत असताना एक ड्राफ्ट सापडला. उत्सुकतेने तो उघडून बघितला तर तो empty  सापडला. हो मोकळा सापडला. मी पण चकीत झालो. पण पुन्हा त्याच ब्लॉग वर लिहायला लागलो. उगाचच मनात विचार आला, ह्या मोकळ्या ड्राफ्ट सारखे बरेच ड्राफ्ट आपल्या खर्या आयुष्यात पण असतात. काहीवेळेस आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला ते माहीत असतात पण आपल्याला ते नको असतात म्हणून आपण त्यांना आपल्या आयुष्यात सामावून घेत नाही. पण काही लोक ह्याच मोकळ्या ड्राफ्ट चा वापर करून खूप मोठे होतात. आपण ज्या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्या गोष्टींना थोडेसे जरी गोंजारले तरी त्या आपल्याला खूप मोठ बनवून जातात. प्रत्येकाच्या आयुष्यात असतो असा मोकळा ड्राफ्ट. काही जन त्याला कायमच डीलीट करतात आणि काही जण माझ्यासारखे त्याच्यावर मजकूर लिहून तो ड्राफ्ट सजवून टाकतात. खर सांगू अजून मला पण माझ्या आयुष्यात सापडला नाही असा मोकळा ड्राफ्ट, कदाचित माझ्या समोरच असेल आणि मला काळात नसेल, पण जेव्हा तो कळेल तेव्हा तो मोकळा ड्राफ्ट शब्दांनी, कष्टानी, आणि माझ्या कर्तबगारी ने सजवून टाकल्याशिवाय मी थांबणार नाही. खरच

Social Media