Skip to main content

Posts

Showing posts from March, 2023

पाडव्याचा महोत्सव

गुढी पाडवा म्हणजे नक्की काय? फक्त गुढी? कडूलिंब, नवीन साडी, उलटा केलेला गडू. आणि एक काठी? पुरणपोळी कि मग आमरास पुरी? पंचपक्वान्न की साधा गोडाचा शिरा.? श्री राम वनवासातून अयोध्येत परत येतात तो दिवस? कि मग ब्रम्ह देवाने ह्याच दिवशी हे विश्व तयार केल म्हणून हा महोत्सव? खर तर निसर्गाच निरीक्षण केल की कळत, का गुढी पाडवा ते. व पू काळे म्हणतात की जगण्याचा महोत्सव करता आला पाहिजे, आणि निसर्गाला जी पालवी फुटते ना त्याचाच असतो हा महोत्सव “गुढी पाडवा”. छोटी छोटी झाडे सुद्धा हिवाळ्यातला कंटाळा होळीत झटकून, चैत्रातल्या नवीन पालवी साठी आतुरतेने वाट बघत असतात. आंब्याची झाडे मोहोराने भरून गेलेली असतात आणि कोकीळ शीळ घालायला चालू झालेला असतो. निसर्गात हे बदल होत असताना मग माणसाने मनांची कात टाकून नवीन संकल्प का करू नयेत? १ जानेवारीला केलेल्या Resolutions पेक्षा हे best नाही का? निसर्गासोबत आपणही नवीन पालवी ओढून घेऊ शकतोच की! पण अश्या सणांना आपल्या आजूबाजूला लोकांच्या वेगवेगळ्या तऱ्हा बघायला मिळतात. त्यात सगळ्यात पुढे असतात ते म्हणजे आदल्या रात्री Whatsapp वर शुभेच्छांचे status ठेवणार

Social Media