Skip to main content

Posts

Showing posts from October, 2017

एका चेहर्याची ओळख

            आज बस मध्ये थोडी कमीच गर्दी दिसली, मग मी पण बोर्ड बघून पटकन आत शिरलो. जास्तीत जास्त १० जण असतील बस मध्ये. पण त्या सगळ्यात एक चेहरा जास्त ओळखीचा वाटला. Campus activities मध्ये ज्या चेहर्याने माझ्या मनाला हेलकावे दिलेले तोच चेहरा मला जणू आज मला खुणावत होता. तिच्या शेजारची जागा मोकळीच होती. मला ही काही सुचलं नाही, मी जाऊन बसलो, तशी ती थोडी अवघडली. तिला कदाचित असा वाटलं असेल की कोण हा मुलगा आणि असा अचानक माझ्याच शेजारी का येऊन बसला? स्वाभाविक आहे, ओळख ना पाळख आणि अस न विचारता मी जाऊन बसलो. मग मीच थोडा ओशाळला झालो आणि थोडा अलीकडे सरकून बसलो. कानात headphone टाकला आणि किशोर कुमार चा अल्बम चालू केला. किशोरदांच्या त्या गितांनी काही वेळ मला विचलीत केलं पण पुन्हा मनात तीच येऊ लागली. "काढावी का ओळख?", "बोलावं का तिच्याशी", "तिला आवडल नाही तर?" फक्त प्रश्नच येत होते. इतक्यात कोणाचीतरी हाक आली. कानातल्या आवाजामुळं नीट ऐकू आल नाही पण मनातून सारख अस वाटत होतं की ही हाक नक्कीच तिने मारली असणार म्हणून अतिउत्साहाच्या भरात मी headphone काढून तिच्याकडे बघितलं तर

माझा देश बदलेलं का??!?

           बदल ही काळाची गरज आहे, कारण जग हे सतत बदलत असते. आणि त्या जगाबरोबर जाण्यासाठी आपल्याला सुद्धा बदलणे गरजेचे असते. सध्याच्या काळात एकच गोष्ट बदलणे गरजेचे आहे ती म्हणजे देश. आपल्या देशात खूप गोष्टी चांगल्या आहेत तश्या खूप साऱ्या गोष्टी वाईट सुद्धा आहेत. आणि वाईट गोष्टी माणसं लगेच स्वीकारतात. काही माणसांना तर देश म्हणजे चहा सोबत गप्पा मारण्याचा विषय आहे असाच वाटत. पण त्यांना हे कळत नाही की , "देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण त्या देशाचे देणे लागतो" , स्वा. सावरकर. आणि लोकमान्य टिळकांनी तर म्हणलेलच आहे की देशकार्य हेच देवकार्य. पण देश बदलणार म्हणजे करणार तरी काय?! हा प्रश्न तुमच्या मनात आहे तसा माझ्याही मनात केव्हापासून घुटमळतोय. देश बदलायला आपल्याला कुठे लष्कराच्या भाकऱ्या भाजायला दिल्ली , मुंबई ला जायचं नाही आपल्याला स्वतः मध्ये बदल आणायचा आहे. कारण ह्या देशातला एक-एक व्यक्ती ह्या देशाला पुढे किंवा मागे न्यायला कारणीभूत होऊ शकतो. माणूस बदलला तर त्याच घर बदलत, घर बदललं तर त्याची गल्ली बदलते, त्या गल्लीच वारं शेजारच्या गल्ल्याना लागलं की गाव आपोआप बदलून

Social Media