Skip to main content

Posts

Showing posts with the label dreams

शोध स्वतःचा, स्वतःच्या स्वप्नांचा

आज मी एक स्वप्न उराशी बाळगून आहे आणि निश्च्तीतच मी ते पूर्ण करणार. पण आयुष्यात खूप घटना अश्या घडतात की आपल्याला आपल्या निर्णयांना, आपल्या स्वप्नाना मुरड घालावी लागते आणि आपण ती घालतो. पण कधीतरी आयुष्यात मला माझ्या खर्या स्वप्नाचा विसर पडला तर हा लेख मला नक्कीच माझ्या स्वप्नांची पुनःश्च एकदा आठवण करून देईल. आज तो क्षण आलाच...! प्रत्येक अभियंत्याच्या आयुष्याची गाथा ठरवणारा किंबहुना त्याचे पुढचे आयुष्य ठरवणारा, तो दिवस. गेली ४ वर्ष कसून तयारी करून स्वतःची जाहिरात करण्याचा दिवस. मी  दरवाज्यावर knock  केल आणि आत गेलो, जाताना ‘may I come in ?’ अस विचारायला अजिबात विसरलो नाही. आत जाऊन मला विकत घ्यायला आलेल्या एका इसामासमोर जाऊन मी उभा राहिलो. त्याने मी न विचारताच बसण्याची खूण केली, मीही पटकन बसलो. मग चालू झाला प्रश्नांचा मार. पहिलाच प्रश्न आला, ‘ओळखीचा’ होता. त्याने विचारल “Tell me something about yourself?”. गेली ४ वर्ष ज्या प्रश्नाच उत्तर रोज देत होतो तोच प्रश्न आज त्यान विचारलेला पहिलाच प्रश्न होता. मी पण जोमात सांगायला सुरुवात केली, “ I am Shardul Narendra Mandrupkar, my hometown is Is

Social Media