Skip to main content

Posts

Showing posts from September, 2023

पहिली भेट

आठवते का आपली पहिली भेट? प्रथम तुज पाहता, काय सांगू काय झाले, तुझ्या नजरेने काळीज माझे घायाळ केले. नक्की प्रेम म्हणजे काय हे कळण्या आधीच प्रेमात पडलो, तुझ्या ओठांत मिसळत येणाऱ्या शब्दात मी अडकलो. तुला पाहताना जीव वेडावून गेला,  तुझे बोल ऐकताना कान तृप्त झाला! पाहता क्षणी वाटले की हीच ती, माझी life Partner, हिच्यासोबत असेल संसार माझा, कोणालाच नाही ही सर. भेटताना तुला वाटले आवडेन का मी तुला? तुझ्या आयुष्यात मिळेल का जागा मला? पण, तू होकार दिलास आणि सगळच खर झालं. सुख, सुख म्हणजे काय नक्की हे मला दिसलं. तू आणि मी एकच झालो,  तुझ्यासोबत आयुष्याचा सोबती मी झालो. आठवते का आपली पहिली भेट? तीच आठवत आठवत आत्ता, तुझ्यासाठी केलेली, तुझी च ही कविता सुचली.

पाऊस मला म्हणाला एकदा!

पाऊस मला खुणावतोय, म्हणतोय बघ मी कसा आहे, थांबतो का कोणासाठी, मला हवं तस मला हवं तिथं माझा मी पडून जातो. मला नाही बंधन कोणतं, अगदी धरणं फोडू शकतो, पाऊस आहे मी, वाऱ्यासोबत तांडव करू शकतो. मग उडते तारांबळ सबंध पृथ्वी लोकाची, घर, महाल किंवा तुमची फॅक्टरी पर्वाच नाही कशाची. रौद्र रूप पावसाचे पाहून मीच थोडा बावरा झालो, विषय थोडा गंभीर वाटला म्हणून थोडा थांबलो. अरे हो हो म्हणालो, माहीत आहे तुझा प्रताप, असाच हैराण करून होतोस मधूनच कटाप. बघ थोडी माझीही स्थिती तू जाणून घे, मन दुबळे असेल तरी भाव माझे समजुन घे, नाही बाबा माणसाला अस मनसोक्त उडता येत, कितीही झेपावल तरी नाही तसं सांभाळता येत. जबाबदारीचे दोर असतात पायात बांधलेले, किती ही म्हणलं तरी त्याचे पाश असतात मनाला कसलेले. तुझ सगळं मान्य आहे, तूच निसर्गाचा राजा, आम्ही शुल्लक मानव जीव, आमची हीच सजा!

काय बोलावे

 काय बोलावे मला कळतच नाही, की ऐकावे नुसते ते सुचतच नाही.. अवघे सारे दुःख माझे व्यक्त कधी होत नाही, परक्याच्या ह्या वेदेनेचे अर्थच मुळी समजत नाही... विषय गंभीर तरी बेजार सर्व काही सुन्न सुन्न, उमजत नाही तसं आता बोलावे की ऐकावे हे सुचतच नाही... कोण मजला पाहिले अन बोलले की त्रस्त आहे, माहिती रे त्रस्त मी तरी उपाय कोणी सुचवला एकही नाही! पाहिजे ते पाहिले प्रत्येकाने, दुवा मी जोडवला नाही, पाहिले पण योग्य तो पाठिंबा मज लाभला नाही...! हा की तो, मी पाहूनी थकलो आता, हा की तो, की मी ह्यातच अडकलो आता, संपले नाही जीवन तरी अडखळला प्राण माझा... हाच आहे का प्रसंग, संपते अनंत इथे नाही?

Social Media