Skip to main content

Posts

Showing posts from 2024

लिहितात नक्की कसं?

 काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं. एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत. खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं? कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल? म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही. हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे. आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो आणि

अयोध्या आणि मी

लहान असताना cds सोबत खेळायला आवडायचं काय माहीत का☺️ खेळत असताना एक कोरी CD सापडली, त्याच्यावर कोणतंच नाव नव्हतं लिहिलेलं, मग त्या videocon च्या CD Player वरती ती लावली, Black and white मध्ये काहीतरी विडिओ चालू झाला, त्याला आवाज नव्हता, फक्त विडिओ. माणसं इकडं तिकडं पळत होती, कोणीतरी कुठल्यातरी इमारतीवर चढून बसलेलं, नुसता दंगाच दिसत होता. बाबांना तो व्हिडीओ दाखवला मग बाबा म्हणाले की हा अयोध्येचा आहे.  अयोध्येचा व्हिडिओ? मग तो व्हिडिओ पुन्हा पहिल्यापासून लावला, दादांना दाखवला, दादा म्हणजे माझे आजोबा. दादांनी मग एक एक करून प्रत्येक गोष्ट सांगायला चालू केली. अयोध्येचा नक्की विषय काय, संघर्ष काय आणि निकाल? (तेव्हा अजून निकाल लागायचा होता) प्रत्येक गोष्ट नीट सविस्तर कळली आणि मग घरात एक जुनी विट बाबांनी काढून दाखवली आणि मग म्हणाले "ही विट आयोध्येची, विवेक गेलेला तेव्हा त्याने आणली"  (विवेक म्हणजे माझा काका) विवेक काका कारसेवेला गेलेला? तो होता ती मशीद पाडली तिथे? किती भाग्यवान!  नुसता तोच भाग्यवान नाही तर आपण सगळेच किती भाग्यवान की त्याच्या सहवासात आपण राहतोय. मग विवेक काकाकडून ऐकलेल

माणूस ओळखायचं गणित

 काहीतरी चुकतंय. माणूस ओळखायला? की माणूस जाणून घ्यायला? कुठेतरी काहीतरी हरवतेय,  मनाच्या कोपऱ्यात शंकांचं काहूर माजतय आणि सैरभैर होऊन चित्त थळ्यावरून हल्लय. काहीच सुचत नाही, कोण कसे आणि कोण कसे... नक्की ओळखायचं तरी कसं? पारखायच कसं की भेटणारा रोज बोलणारा आपला म्हणायचा तो माणूस आपलाच का? काहीतरी वेगळं पाहिजे ना? वेगळी नीती, वेगळी पद्धत? माणसं ओळखायची?? एक टूलकिट वगैरे सारखं म्हणजे कसं माणसं ओळखता येतील. कोणीतरी पुढे येऊन ये करायला पाहिजे, एक पद्धत बनवून सगळ्यांचच कल्याण केलं पाहिजे. कधी कधी कोड च पडत की हा समोर बसलेला माणूस जो आपल्याशी प्रेमाने बोलतोय, आपल्या जवळ येतोय तो नक्की मनातून आपलाच विचार करतोय का? आपल्याच भल्याचा विचार करतोय की फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतोय? कुठून येतं ते तंत्र जिथे माणसं ओळखायची कला अवगत होती? "बघितल्या बघितल्या मी ओळखलं होत, हा किंवा ही कशी आहे ते" हे बघितल्या बघितल्या ओळखायचं skill येतं कुठून? आणि कसं शिकायचं?  मला पण शिकायचंय, माणसं ओळखायला आणि जश्यास तस वागायला, परिस्थिती बघून पलटी मारणाऱ्या आणि नको तेव्हा इगो मोठा करून फुगून बसणाऱ्या, आपला

Social Media