Skip to main content

Posts

Showing posts with the label karseva

अयोध्या आणि मी

लहान असताना cds सोबत खेळायला आवडायचं काय माहीत का☺️ खेळत असताना एक कोरी CD सापडली, त्याच्यावर कोणतंच नाव नव्हतं लिहिलेलं, मग त्या videocon च्या CD Player वरती ती लावली, Black and white मध्ये काहीतरी विडिओ चालू झाला, त्याला आवाज नव्हता, फक्त विडिओ. माणसं इकडं तिकडं पळत होती, कोणीतरी कुठल्यातरी इमारतीवर चढून बसलेलं, नुसता दंगाच दिसत होता. बाबांना तो व्हिडीओ दाखवला मग बाबा म्हणाले की हा अयोध्येचा आहे.  अयोध्येचा व्हिडिओ? मग तो व्हिडिओ पुन्हा पहिल्यापासून लावला, दादांना दाखवला, दादा म्हणजे माझे आजोबा. दादांनी मग एक एक करून प्रत्येक गोष्ट सांगायला चालू केली. अयोध्येचा नक्की विषय काय, संघर्ष काय आणि निकाल? (तेव्हा अजून निकाल लागायचा होता) प्रत्येक गोष्ट नीट सविस्तर कळली आणि मग घरात एक जुनी विट बाबांनी काढून दाखवली आणि मग म्हणाले "ही विट आयोध्येची, विवेक गेलेला तेव्हा त्याने आणली"  (विवेक म्हणजे माझा काका) विवेक काका कारसेवेला गेलेला? तो होता ती मशीद पाडली तिथे? किती भाग्यवान!  नुसता तोच भाग्यवान नाही तर आपण सगळेच किती भाग्यवान की त्याच्या सहवासात आपण राहतोय. मग विवेक काकाकडून ऐकलेल

Social Media