Skip to main content

Posts

Showing posts from September, 2018

निसर्गचित्र : 2

निसर्गचित्र : १   पासून पुढे... "का रे? तोंड एवढ लालबुंद कशान झाल?", आई ने झटक्यात माझ्या चेहऱ्यावर दिसणारा फरक ओळखला! "माझा फेसवॉश परत वापरलास काय? ॲलर्जी आहे आपल्याला माहितीये ना तरी पण? " आई ला कस सांगायच आता मी नक्की तोंड कुठून लाल करून आलो ते! आई ने परत माझ्याकड डोळे वटारून बघितल आणि मी तोंड खाली घालून पोहे खायला लागलो. डोक्यात चालूच होत ते सकाळी बाथरूम मध्ये घडलेल. "आज शाळेत जायच्या आधी परत एकदा बाथरूम मध्ये जाऊन बघायलाच पाहिजे काय होत ते", मी स्वतःशीच म्हणालो. "काय?", आईने बहुतेक ऐकल मी म्हणलेल पण तरी काही नाही अस सांगत मी मान हालवली! कधी कधी आईसमोर सुद्धा आपण कशालाही घाबरत नाही अस दाखवायची हुक्की येते आणि म्हणूनच मी तीला त्या घटनेबद्दल काहीच बोललो नाही. पोहे कसेतरी संपवले आणि झटक्यात बाथरूम मध्ये पळालो. आवाज यायची वाट बघायला लागलो, ५ मिनिटे झाली, १० झाली पण आवाज येईना. मग लक्षात आल की सकाळी पाणी सोडलेल बादलीत! नळ चालू केला आणि बादलीकडे पाठ करून आरशात बघत उभा राहीलो . एक मन म्हणत होते की खरच कोणीतरी बोलले सकाळी तर दुसरे मन म्ह

निसर्गचित्र : १

"अरे उठ की आता, १० वाजले", आई अगदी किंचाळून उठवत होती मला! आणि मग शेवटचा उपाय म्हणून तीने टेबल वरचा तांब्या उचलला आणि माझ्या तोंडावर रिकामा करून मोकळी झाली! "आई!", अगदी झोपायच्या आधी किंवा उठल्या नंतर मला किती पण त्रास द्या फक्त झोपेतून उठवायच नाही, नायतर मग माझ डोक सटकतच! "सुट्टीच चालू आहे की आई कशाला उठवलस", मी कितीही तक्रार करू देत पण आमची आई त्याला एकाच प्रकारे उत्तर देते 'गप्प बसून' कारण तीला माहीती आहेच शब्दाला शब्द वाढला आणि बाबांना बोलवायची गरज पडली तर किती प्रकारच्या शिव्या पडतात मला ते! आई च्या खास आग्रहास्तव मी पण मग उठून, आवरून, आंघोळीला गेलो! बाथटब वगेरे असल्या फाजील लाडांना आमच्या घरी जागा नाही, गॅस गीझर चालू केला आणि बादलीत पाणी सोडल आणि बादली भरायची वाट बघू लागलो! बादलीत पडणाऱ्या पाण्याचा आवाज जस जस पाणी वाढत होत तसा तसा कमी होत होता, तोपर्यंत काय टाईमपास करायचा आणि किती वेळ बादलीकडे बघत बसायच म्हणून मी शेजारच्या आरश्यात बघून दाढी कुरवाळत बसलो. तेवढ्यात मागून आवाज आला,    "शूऽऽशूऽऽक  शूऽऽशूऽऽक" मागे वळून बघित

Social Media