Skip to main content

Posts

Showing posts from July, 2018

"जीम जॅम जेमी बूम"

"जीम जॅम जेमी बूम" काय आठवल का? शाळा सुटल्यावर पळत पळत घरी जाऊन हात पाय धुतल्यावर आईने दिलेला तो पोह्याचा चिवडा खात T.V. लाऊन बसायचो! आणि दुनियेला वाचवण्यासाठी यायचा Junior G . त्याच्या त्या निळ्या outfit च्या प्रेमात बहुतेक आपण सगळेच पडलो असू! रविवारी थोड उशीरा उठून आई चा ओरडा खाल्यावर दिवसभर पाठीला शाल किंवा towel गुंडाळून घरभर पळायचो आणि स्वतःलाच Junior G असल्या सारख समजायचो. दुपारी लागायच ते शक्तीमान आणि संध्याकाळी Junior G, आधे मधे मालगुडी डेज च वेगळच अप्रूप असायच. तसे option फार नव्हते, आमच्याकडे तरी खूप वर्षे दूरदर्शनच लागायच. परत परत tv च्या antenna ला थटून दुसर्याची cable जायला लागली तेव्हा कुठे star plus, sahara tv, cartoon network असे अवली चॅनेल्स दिसायला चालू झाले तरी पण शक्तीमान ची वेळ शेवट पर्यंत चुकली नाही. संध्याकाळच्या Junior G ची सांगता झाल्यावर त्याची जागा Sahara वरच्या सिंबा ने घेतली आणि त्याच्यानंतर ची ती सिंडरेला! Jungle Book तेव्हा पुन्हा Sahara tv वर चालू झालेल आणि आम्ही पोर त्या मोगली च्या दुनियेत हरवून बसलेलो. उंदराच्या माग पळणाऱ्या मांजराची चटक प

मी एकदा पावसात

दुकानात फक्त Parle-G चा पुडा आणायला गेलेलो, आणि पावसाने अचानक जोर धरला. भिजत जाव की नको असा विचार मनात आला पण म्हणल की कधी एवढ पळत जायच! जरा कमी आला की जाऊया म्हणून तिथेच थांबलो. जवळच मुलींची शाळा असल्यामूळे दुकानात गिर्ह्राईकांच्या ऐवजी मुलींचीच गर्दी अधिक. बघितल तर ८-९वी तल्या मुली असाव्यात, एकीने दप्तरामधून एक मोठा मोबाइल बाहेर काढला तो मोबाईल बघून चाटच पडलो. एवढा ग्रज्युएट झालोय पण अजून एवढा भारीतला मोबाईल घ्यायच धाडस होत नाही माझ आणि ही मुलगी अगदी हसत खेळत मोबाईल वापरत होती. तेवढ्यात तीला कोणाचातरी call आला, "हो अरे भिजत नाहीये मी, दुकानात थांबले एका!" तिकडून कोणितरी तीला भिजू नको अस सांगत होत. मला वाटल भाऊ, वडील वगेरे वगैरे कोणितरी असेल. " नको दादा येणार आहे न्यायला, तु नको येऊ " (तिकडून येण्याबद्दल काहितरी बोलण झाल असाव) ही काहीतरी वेगळीच भानगड दिसते अस म्हणून मी त्या बोलण्याकडे सपशेल दुर्लक्ष करायला चालू केल! एखाद्याच्या personal गोष्टींशी आपल्याला काय करायच आहे. बाहेर पावसाचा तडाखा वाढतच होता, आणि मला शेजारी उभारलेल्या त्या मुलीच्या फोन वरच्या बोलण्याने अ

Social Media