Skip to main content

Posts

Showing posts from April, 2016

आयुष्य थोड्या वेगळ्या वाटेने...!

लेखक जे काही लिहतो त्याच नवल तो सोडून इतर सगळ्यांना वाटत असत ... खर सांगू का? लेखकाला त्याच काहीच अप्रूप वाटत नसत. त्याच्यासाठी ते एखाद्या मराठीच्या पेपर मधल्या क्षुल्लक निबंधासारख असत ते. त्यामुळे जस परीक्षेत आपल्याला कळत नाही की निबंध काय लिहिला जातोय तसा लेखकाला सुद्धा काळात नसत की तो जे लिहितोय ते खरच इतर लोक वाचतील का? त्याच काम लिहीण आहे आणि आपल्यासारख्यांच काम ते वाचणं हे आहे. मघाशीच पु.ल. देशपांडेंच एक वाक्य वाचनात आल... कदाचित त्याच शीर्षक फसवणूक आणि हसवणूक अस होता पण वाक्याचा अर्थ समजून घेण खूप म्हत्वाच आहे असा मला वाटत. पु.ल. असा लिहितात, “जन्म आणि मृत्यू ह्या दोन टोकांमध्ये पकडून नियतिने चालवलेली आपणा सगळ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणार्या माणसांची ‘हसवणूक’ करण्यापलीकडे आणखी काय करायचं?” खरच बघा त्यानी त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा अर्थ ह्यात स्पष्ट केलाय अगदी. त्यांनी आयुष्यभर आपल्याला हसवलं आणि अजूनही त्यांची पुस्तकं, कथा आपल्याला अजून हसवतायत. त्यानी आयुष्याची गाडी वेगळ्या पद्धतीने चालवली आणि ते यशस्वी झाले. जन्म ते मृत्यू

मी, माझा ब्लॉग, आणि तुम्ही..

.. खूप अतूट नात आहे तुमच आणि माझ... ह्या ब्लॉग मुळ आपण भेटतो म्हणजे हा ब्लॉग सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे न? लेखकाच्या आकांक्षेचा आणि महत्वाकांक्षेचा साक्षीदार असतो तो म्हणजे त्याने लिहीलेल्या लेखांचा, पुस्तकांचा वाचक...आणि वाचकाच्या भावना समजून उमजून त्याच्या मनात नवचैतन्य आणि आनंदाची नवीन भावना निर्माण करतो तो असतो लेखक.. म्हणजे बघा वाचक असेल तर लेखक जगेल आणि लेखक नसेल तर वाचकाच्या जीवनाचा अर्थच उरणार नाही. हल्लीच्या काळात कोणी पुस्तक वाचत नाही म्हणून आपण कीतीही ओरड केली तरी पुस्तक वाचणार्यांची संख्या कमी होत नाही. मला तर असा वातातात्य की जे पुस्तक वाचताच नाहेत आणि ज्यांना वाटत की इतरांनीही ते वाचू नये ते असला आगाऊपणा करत असतात आणि आमच्यासारख्या भोळ्या भाबड्या नवलेखकांचे लेख वाचणाऱ्या वाचकांचे मन परावृत्त करतात.... तरीही असंख्य असे वाचक असतात जे आम्हाला अविरत प्रेरणा देत असतात. आणि भविष्यात सुद्धा देत राहतील... मागच्याच महिन्यामध्ये माझ्या ह्या ब्लॉग चे     १००० views    कम्प्लीट झाले, याचा मला आनंद तर आहेच पण ह्या मुळे मिळालेल्या प्रेरणेने मी अधिक लेख तुम्हाला उपलब्ध करून द

Social Media