Skip to main content

Posts

Showing posts from September, 2015
   माणसाच्या भावना ह्या कायम निर्गुण असतात, निराकार असतात पण त्याच भावनांमध्ये दडलेला असतो त्या व्यक्ती चा स्वभाव. भावना ह्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात आणि त्या व्यक्त करण्याचे प्रकार सुद्धा वेगवेगळे असतात. भावनांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत. आपोआप व्यक्त होणाऱ्या नैसर्गिक क्रियेला सुद्धा एक नाव देऊन त्याचे सुद्धा प्रकार आपणच पाडलेले आहेत. प्रेम, राग, लोभ, दुःख, आनंद, समाधान अश्या वेगवेगळ्या प्रकारात भावनेचा उल्लेख केला जातो. आपल्या सभोवताली राहणाऱ्या, फिरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भावना व्यक्त करायच्या तऱ्हा निरनिराळ्या आणि त्या भावनांचा उलगडा करणारे त्या व्यक्तीचे शब्द सुद्धा निराळे.          आता बघा हा, “प्रेम” व्यक्त करायचे नानाविविध प्रकार आपल्या बघायला मिळतात. सिनेमा मध्ये वेगळा असतो, एखाद्या तरुणाने अनोळखी मुलीसाठी केलेला वेगळा असतो, आपल्या एखाद्या मित्राने/मैत्रिणीने आपल्याच वर्गातल्या मुलीला/मुलाला वेगळा असतो. हे सगळा असूनही प्रेम हि भावना मात्र एकच असते. कोणीतरी जमिनीवर गुढघे टेकून व्यक्त करतो, कोणी पत्र पाठवतो (हल्ली कोणी पाठवत नाही म्हणा तरीही एखादा असत

Social Media