Skip to main content

Posts

Showing posts from June, 2019

घर-सुख

रोजची दगदग, बारा बारा तास Office आणि त्यानंतर रस्त्यावरच ते जीवघेण ट्राफिक, सगळ सगळ अगदी कंटाळवाण आणि अश्यातच एक मोठी सुट्टी मिळण म्हणजे स्वर्गाला दोन बोट कमी! मनात चार दिवस आधीपासूनच चालू असलेली उत्सुकता आणि चेहऱ्यावरून न लपणारी पण ओसंडून वाहणारी excitement ह्या सगळ्यात तो शेवटी दिवस येतोच, booking झाल असल्यामुळे आपण लीड ला आगाउ कल्पना देउन लवकर निघतोच आणि आधिच भरलेल्या Bag ला पाठीला लटकवून बस मधे चढतो, बस मधे चढताच मनात चालू झालेली घालमेल, आणि आजुबाजुला मराठी लोकांचे आवाज, सुखकर वाटतात आणि सहा महिन्याच्या स्वल्पविरामानंतर घराकडे कूच केली जाते. रात्री झोप सुद्धा व्यवस्थित लागत नाही कारण समोर घर दिसत असत. पोटभरून आनंद झालेला असतो आणि आता waiting असत ते बस गावात पोचण्याच. घरापर्यंत पोचल्यावर घरात पाऊल ठेवायच्या आधी आपल्या मायभुमीच्या स्पर्शाने सर्वांग शहारून जात, सगळा ताण विसरून मन त्या ओळखीच्या अल्हाददायक हवेत रममाण होत. घराजवळ बाबानी लावलेली फुलझाडांची बाग आपलीच वाट बघत होती असाच भास होतो, मोगरा आपला सुगंध माझ्या नाकांपर्यंत पोचवायला त्याचे पंचप्राण लावतो पण बकुळीचा वृक्ष आपल्य

Social Media