भारत हा माझा देश आहे...
भारत खरच माझा देश आहे ?
हो, भारत माझाच देश आहे. १ली ते १०वी रोज शाळेत
जी प्रतिज्ञा म्हणतो, त्याची सुरुवात हीच असते की भारत माझा देश आहे...
पण आता ते वाक्य थोडासा बदलायला पाहिजे... भारत कधी
कधी माझा देश आहे.
बरोबर, मी भारतातच राहतो पण मग भारत हा कधी कधी
माझा देश कसा काय ?
ह्याच उत्तर खूपच साध आहे, आपल्या आजू बाजूला च
आहे ह्याच उत्तर.
कालच १५ ऑगस्ट होऊन गेला... कालच्या दिवशी तर
भारत हा हमखास माझाच असतो आणि ह्या देशातला प्रत्येक “मी” भारताच गुणगान गात असतो.
परंतू १६ ऑगस्ट पासून पुन्हा सगळे आपापल्या
कामात व्यस्त होतात आणि पुन्हा भारत परका होतो.
रोजच्या जीवनात कोणीही त्याचे (आपल्याच देशाचे)
गुणगान करत नाही. फक्त त्याला शिव्याच मिळतात...
“कसले हे रस्ते? रस्ते नव्हे खड्डेच... लोड
शेडींग ची बोंब... पिण्याच्या पाण्याची ओरड...
भ्रष्टाचाराचा भस्मासुर...”
भारतातल्या प्रत्येक गावातून रोज आपल्याला हे
असे तक्रारींचे सूर रोज नक्कीच न चुकता ऐकू येतात...तक्रारी तर असंख्य असतात पण
त्या सोडवण्यात कोणाला रस नसतो...
आपण प्रतिज्ञेत म्हणतो की भारत माझा देश आहे, “जर
भारत तुमचा देश आहे तर मग भारतातल्या प्रत्येक गावातल्या समस्या तुमच्या सुध्धा
नाहीत का ?” हो, आता ह्यावर तुमच उत्तर असणार की “सरकार, सरकार आहे की तक्रारी
सोडवायला “...
अहो.. पण देश आपलासुद्धा आहे फक्त सरकार चा
नाही... जर तक्रारी सुटत नसतील तर ते सरकार सुद्धा बिनकामाचच.. पण जर सरकार शांत
असेल तर सामान्य नागरिकाने पावले उचलणे हे अत्यंत गरजेचे बनते...
चला... तक्रारींच सोडा... शिक्षणाच बघूया...
अभियांत्रिकीच शिक्षण घेणारा प्रत्येक
विद्यार्थी हा फक्त IT कंपनीत नोकरी कराय्साठ्च त्याची डिग्री पूर्ण करत असतो... IIT सारख्या मोठ्या
महाविद्यालयातून सुद्धा पदवी घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा MNC मध्येच नोकरी करतो आणि अमेरिका
किंवा इंग्लंड इथे जाऊन स्थायिक होतो.
ह्या सगळ्यांना माझा प्रश्न
आहे... तुम्ही शिकलात भारतात, तुम्ही जगलात भारतात, तुम्ही आई भारतीय, तुमचे वडील सुद्धा भारतीय, मग तुम्ही बाहेर जायची स्वप्न
बघताच का ? तुम्हाला भारत आपला वाटत नाही ?? की तुम्हाला तुमच्या वाटणार्या देशाला
सुधारायला प्रयत्नच करावासा वाटत नाही ??
भारताबद्दल च प्रेम हे
फक्त १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचलाच का ? उफाळून येत?
म्हणूनच तुमच्या साठी, आपल्या
साठी, माझ्यासाठी, आणि अखंड भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी भारत हा कधी कधी चहा
बरोबर फक्त चघळण्याचा विषय बनलेला आहे...
“भारत कधी कधीच माझा
देश आहे”
Comments