माणसाच्या भावना ह्या कायम निर्गुण असतात, निराकार असतात पण त्याच भावनांमध्ये
दडलेला असतो त्या व्यक्ती चा स्वभाव. भावना ह्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात आणि
त्या व्यक्त करण्याचे प्रकार सुद्धा वेगवेगळे असतात.
भावनांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत. आपोआप
व्यक्त होणाऱ्या नैसर्गिक क्रियेला सुद्धा एक नाव देऊन त्याचे सुद्धा प्रकार आपणच
पाडलेले आहेत. प्रेम, राग, लोभ, दुःख, आनंद, समाधान अश्या वेगवेगळ्या प्रकारात
भावनेचा उल्लेख केला जातो.
आपल्या सभोवताली राहणाऱ्या, फिरणाऱ्या प्रत्येक
व्यक्तीच्या भावना व्यक्त करायच्या तऱ्हा निरनिराळ्या आणि त्या भावनांचा उलगडा
करणारे त्या व्यक्तीचे शब्द सुद्धा निराळे.
आता बघा हा, “प्रेम” व्यक्त करायचे नानाविविध प्रकार आपल्या बघायला मिळतात.
सिनेमा मध्ये वेगळा असतो, एखाद्या तरुणाने अनोळखी मुलीसाठी केलेला वेगळा असतो,
आपल्या एखाद्या मित्राने/मैत्रिणीने आपल्याच वर्गातल्या मुलीला/मुलाला वेगळा असतो.
हे सगळा असूनही प्रेम हि भावना मात्र एकच असते. कोणीतरी जमिनीवर गुढघे टेकून
व्यक्त करतो, कोणी पत्र पाठवतो (हल्ली कोणी पाठवत नाही म्हणा तरीही एखादा असतो कि
हो जुन्या विचारांचा), कोणी कविता तयार करतो, तर कोणी व्यक्तच करत नाही....
माझ्या एका मित्राने, माझ्याच अजून एका मैत्रिणीला
प्रपोज केला, आधी पत्र पाठवला त्याच उत्तर आला नाही म्हणून मग मेसेज केला,
त्याचाही उत्तर आला नाही म्हणून साहेबांनी थेट समोर जाऊन अगदी गुढगे जमिनीवर
टेकवून, हात जोडून प्रपोज केला.... आणि कहर म्हणजे हे सगळा आमच्या कॉलेज च्या बस
मध्ये.. परिणामतः मित्राला तिच्या भावाचा कपडे फाटेपर्यंत मार खावा लागला.
त्याच्या भावना निर्मळ होत्या, स्पष्ट प्रेमाचा
भाव त्याने व्यक्त केला होता पण गडबड झाली नको तिथ व्यक्त करून बसला. तरी प्रेम
भावना ही चांगली पण ती कुठे, कधी, आणि कशी व्यक्त करायची ते वेळ बघून ठरवायचं.
प्रेम
सोडा, तो विषय आपल्यासारख्यांच्या चर्चे चा नाही (म्हणजे अगदीच नाही असा नाही पण
आत्ता नको) तुम्ही आनंदाच घ्या, आनंदा नाही!!!. “आनंद”, ही सुद्धा भावना आहे.
मनाच्या काही फसव्या खेळांच्यात हा एक. असा म्हणतात की दुःख आणि सुख(आनंद) एका पाठोपाठ
येतात, पण मी म्हणतो की आनंद कधी जातच नाही, आपण मानला तर आनंद हा प्रत्येक
गोष्टींमध्ये लपलेला असतो.
म्हणूनच प्रथम मनाला समजावून सांगायला हवा की जे
माझ्या बाबतीत घडतंय ते चांगलाच घडतंय...!
Comments