Skip to main content

नीरज्या

मैत्री व्हायला फार काही लागत नाही फक्त एकदा भेट होण महत्वाच असत. मैत्री कामातून होते, वर्गातल्या एकाच बाकावर होते, दुपारच्या सुट्टीत खाल्लेल्या डब्यामुळे होते, ती अनपेक्षित असते म्हणून खुलते.
मला आठवतय college सूरू झाल्यापासून पहिलच practical होत FEC ह्या विषयाच एका मित्राला विचारून मी एका building खाली उभा होतो, त्याच building मध्ये त्या विषयाची lab होती. तेवढ्यात तिथे वर्गातलाच पण एक अनोळखी मुलगा दिसला, माझ्याकडे पाहून हसला मग मीही त्याच्याशी बोलायला गेलो. त्याने विचारले, "डबा खाल्लास का?" अरे हो मी तर डबा खायचाच राहिलेलो; "चल खाउया", अस म्हणून तो मला ground वर घेऊनच गेला. त्याच्या सांगलीच्या मित्रांच्यासोबत डबा खायला. डबा खाऊन झाल्यावर confirm करण्यासाठी परत lab चा पत्ता विचारला आणि खरच ही त्याची आणि माझी पहिलीच भेट होती, तो मला lab पर्यंत सोडायला आला. तेव्हापासून आत्ता अगदी ५ मिनिटांपुर्वी पर्यंत आम्ही कायम सोबत असतो. college मध्ये तर काहीही काम असुदे आम्ही एकत्रच असायचो. FE मध्ये वर्गात झालेला पहिला मित्र म्हणजे नीरज. नीरज दाते, हुशार, खेळाडू वृत्तीचा आणि आपण ज्या व्यक्तीला चुणचुणीत अस म्हणतो ना तसा हा नीरज. सांगलीत गावभागात राहणारा आणि ज्या मित्राने स्वतःच्या पैशाने पहिल्यांदा चहा पाजला असा मित्र. तेव्हा त्याला म्हणालेलो उद्या देतो ५ रुपये पण तो मला म्हणालेला, "चहा दे मला उद्या, पैसे नको"
चांगल्या गोष्टीला चांगल म्हणणारा आणि वाईट गोष्टीला वाईट म्हणणारा माणूस आयुष्यात काहीही साध्य करू शकतो हे नीरज कडूनच शिकावे. तसे त्याचे खूप गुण सांगण्यासारखे आणि शिकण्यासारखे आहेत पण एक गोष्ट की जी मी त्याच्याकडून शिकलो ती मला सगळ्यांना सांगायची आहे. एकदा college मध्ये माझ्याकडून एक चुक घडली आणि ती त्याने ओळखली पण तो तिथे सगळ्यांसमोर काहीच बोलला नाही; संध्याकाळी त्याचा मला call आला आणि त्याने माझी चांगलीच कानउघाडणी केली. ही गोष्ट त्याच्या रोजच्या स्वभावातली आहे त्यामुळे त्याच्या लक्षातही येत नसे कदाचित पण मी तर त्याच्याकडून हेच शिकलो की, " कौतुक सर्वांसमोर करायच पण चुकीची शिक्षा ही एकांतात "
माझ्या ह्या दोस्ताला मी देखील खूप वेळा दुखवलय पण तरीही मला पुरेपूर ओळखून तो माझ्यासोबत उभा आहे ह्याचे जास्त समधान आहे. आयुष्यात असे मित्र खूप कमी मिळतात की ज्यांच्यासमोर आनंदाचा नाच आणी चुकीची कबूली दोन्ही करायला संकोच वाटत नाही आणि नीरज हा त्यांच्यातीलच एक आहे.
आता job ला असल्यामुळे तस रोज बोलण होत नाही पण रोजच्या कामात कुठेना कुठेतरी त्याला माझी आणि मला त्याची आठवण येतच राहणार.
माझ्या लेखनाच्या प्रवासातील पण एक खूप महत्वाचा साथीदार आहे हा, माझ्या पहिल्या लेखांचा पहिला वहिला वाचक म्हणून काम बघणारा हा माझा मित्र कायम सत्य प्रतिक्रिया द्यायचा म्हणूनच कदाचित माझ लेखन सुधारल. आमच्या college च्या magazine मध्ये शिरायला पण हेच बंधु कारणीभूत ठरले. शेवटच्या वर्षी मराठी विभागाचा संपादक तु व्हावस ही तुझी आणि माझीही इच्छा होती पण ते जमले नाही तरी मी तुला वचन दिलेले की ह्यावर्षीच्या magazine मध्ये माझा एकही लेख नसेल आणि ते मी पाळलय.
रात्रभर जागून अभ्यास करायची craze आमच्या वर्गात नीरज नेच आणली म्हणूनच त्याला ( वटवाघूळ ) म्हणतात ;) अगदी रात्री १० वाजता अभ्यास सुरू करायचा आणि पहाटे पहाटे ६ वाजता झोपायच असा हा नित्यक्रम आमच्या नीरज चा. (शेवटच्या सेम ला मी पण एकदा ह्याचा अनुभव घेऊन पाहिलाय)
college मधे अलिकडेच signature day झाला नीरज सकाळपासून माग लागलेला की त्याच्या tshirt वरती मी काहितरी लिहाव पण खर सांगू मित्रा,
काही माणस मनात घर करून असतात त्यांच्यासाठी वेगळ अस काय लिहायच? आणि लिहिल असतही तरी तेवढा तो tshirt पुरला नसता! माफ कर मी अजूनही त्यावर लिहिण्यासाठी विचार करतोय.
तुझ्या सोबतीमुळे खूप अडचणी हसत हसत पार केल्या आणि तुझ्या सानिध्यामूळे माझेही आयुष्य संपन्न झाले. माझ्यासाठी तु किती महत्वाचा होतास आणि आहेस हे वेगळ सांगयची मला तरी गरज वाटत नाही!
Always There For You!


Comments

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

माणूस ओळखायचं गणित

 काहीतरी चुकतंय. माणूस ओळखायला? की माणूस जाणून घ्यायला? कुठेतरी काहीतरी हरवतेय,  मनाच्या कोपऱ्यात शंकांचं काहूर माजतय आणि सैरभैर होऊन चित्त थळ्यावरून हल्लय. काहीच सुचत नाही, कोण कसे आणि कोण कसे... नक्की ओळखायचं तरी कसं? पारखायच कसं की भेटणारा रोज बोलणारा आपला म्हणायचा तो माणूस आपलाच का? काहीतरी वेगळं पाहिजे ना? वेगळी नीती, वेगळी पद्धत? माणसं ओळखायची?? एक टूलकिट वगैरे सारखं म्हणजे कसं माणसं ओळखता येतील. कोणीतरी पुढे येऊन ये करायला पाहिजे, एक पद्धत बनवून सगळ्यांचच कल्याण केलं पाहिजे. कधी कधी कोड च पडत की हा समोर बसलेला माणूस जो आपल्याशी प्रेमाने बोलतोय, आपल्या जवळ येतोय तो नक्की मनातून आपलाच विचार करतोय का? आपल्याच भल्याचा विचार करतोय की फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतोय? कुठून येतं ते तंत्र जिथे माणसं ओळखायची कला अवगत होती? "बघितल्या बघितल्या मी ओळखलं होत, हा किंवा ही कशी आहे ते" हे बघितल्या बघितल्या ओळखायचं skill येतं कुठून? आणि कसं शिकायचं?  मला पण शिकायचंय, माणसं ओळखायला आणि जश्यास तस वागायला, परिस्थिती बघून पलटी मारणाऱ्या आणि नको तेव्हा इगो मोठा करून फुगून बसणाऱ्या, आ...

लिहितात नक्की कसं?

 काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं. एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत. खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं? कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल? म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही. हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे. आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो ...

Social Media