Skip to main content

An empty DRAFT

आज खूप दिवसांनी ब्लॉग उघडला.  settings चेक करत असताना एक ड्राफ्ट सापडला. उत्सुकतेने तो उघडून बघितला तर तो empty  सापडला. हो मोकळा सापडला. मी पण चकीत झालो. पण पुन्हा त्याच ब्लॉग वर लिहायला लागलो.उगाचच मनात विचार आला, ह्या मोकळ्या ड्राफ्ट सारखे बरेच ड्राफ्ट आपल्या खर्या आयुष्यात पण असतात.काहीवेळेस आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला ते माहीत असतात पण आपल्याला ते नको असतात म्हणून आपण त्यांना आपल्या आयुष्यात सामावून घेत नाही.पण काही लोक ह्याच मोकळ्या ड्राफ्ट चा वापर करून खूप मोठे होतात. आपण ज्या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्या गोष्टींना थोडेसे जरी गोंजारले तरी त्या आपल्याला खूप मोठ बनवून जातात.प्रत्येकाच्या आयुष्यात असतो असा मोकळा ड्राफ्ट. काही जन त्याला कायमच डीलीट करतात आणि काही जण माझ्यासारखे त्याच्यावर मजकूर लिहून तो ड्राफ्ट सजवून टाकतात.खर सांगू अजून मला पण माझ्या आयुष्यात सापडला नाही असा मोकळा ड्राफ्ट, कदाचित माझ्या समोरच असेल आणि मला काळात नसेल, पण जेव्हा तो कळेल तेव्हा तो मोकळा ड्राफ्ट शब्दांनी, कष्टानी, आणि माझ्या कर्तबगारी ने सजवून टाकल्याशिवाय मी थांबणार नाही.खरच प्रत्येकाला असा ड्राफ्ट सापडायला हवा आणि प्रत्येकाने तो उपयोगात आणायला हवा. जस आपण म्हणतो ना पैसे फिटे पर्यंत तसच देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर वापर केल्याखेरीज मानवाचा सर्वांगीण विकास होणे शक्यच नाही.खूप दिवसांनी काहीतरी लिहावास वाटल ते पण एका मोकळ्या  ड्राफ्ट मुळे...तुम्हाला सुद्धा असा एखादा मोकळा ड्राफ्ट भेटावा हीच आशा... 

Comments

Paresh said…
Good to see this side of yours .. a pleasant surprise .. keep it up.
Komal Todkar said…
Very nice!! keep writing!

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

ते शेवटचे दिवस

आज class मध्ये बसून पण थोड एकट एकट वाटल. मुल थोडी कमीच होती, जी होती ती आपल्याच नादात होती पण मी तिथे एकटाच होतो. आज जाणवल , शेवटचा महिना, शेवटचे ३०-४० दिवस, college मधल्या त्या वातावरणात वेळ घालवायाची शेवटेची संधी. त्या बेंच वर बसून दंगा करायचे शेवटचे दिवस . कुठे कोणाशी झालेल भांडण मिटवायच असेल किंवा अबोला सोडायचा असेल तर शेवटचे सोनेरी दिवस.  मनात थोडी भीती वाटते आज... रोज सकाळी बस मध्ये बसून college च्या stop वर उतरायची सवय मोडावी लागणार काही दिवसात. Lecture तर दूर पण त्या बदाम चौकाततरी आपल्याला कोणी ओळखेल का? मित्रांना मुक्त पणे शिव्या देत फिरण्याचे दिवस संपणार.. lipton वर दर संध्याकाळी केलेला चहा- नाश्टा परत रोज नाही मिळणार. उमेश दादाशी गप्पा मारत घालवलेले दिवस college संपल्यावर पुन्हा कधी मिळणार ? ४:१५ नंतरची classtest आणि मध्येच मुसंडी मारणार्या midsem आपण परत कधीच नाही देणार.! Ground वरच्या बेंच वर बसून केलेला timepass परत नाहीच होणार! Lunch Break मध्ये डबा खाण्याचा बेत कदाचीत नाहीच करता येणार. नीरज्याच्या डब्यातील roll, वैभव च्या डब्यातल्या चपात्या, कुलदीप ची आवडती ट...

गोष्ट

 चला, आज खूप दिवसांनी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, गोष्ट म्हणजे कोणाची गोष्ट? तर ही गोष्ट आहे ती आहे एक घराची.  बेंगलोर मध्ये नव्याने नवीन भागात राहायला आल्यावर येताना जाताना दिसणारे एक छोटंसं जून घर. ज्या पाणीपुरी वाल्याकडे पाणीपुरी खायला जातो त्याच्या दुकानासमोर असलेलं. पाणीपुरी खात खात मी पाहात होतो की, ती जुनी घर असतात ना, तळमजल्यावर दुकान आणि वरती रहण्याजोग्या २-३ खोल्या, छप्पर शक्यतो पत्र्याच असतं बघा तसच हे घर. खाली किरणामालाच आणि सोबतच झेरॉक्स च दुकान आणि दुकानाची भिंत संपली की लागूनच वरती जायला जिना. ते बघता क्षणी माझ्या डोक्यात प्रश्न आला की कशी असेल ही छोटीशी इमारत ती उभी राहिली त्या वर्षात?  नवीन रंग असेल चमकत असेल कदाचित भागामध्ये हीच सुंदर दिसणारी एकुलती एक असेल बहुतेक. आजूबाजूच्या कॉलेज मधल्या विद्यार्थिनी किंवा नवीन बिऱ्हाड करणारे प्रोफेसर? किंवा एका खोलीत एक आणि एका खोलीत एक अशी दोन बिऱ्हाड? मुख्य रस्त्यावरच असल्यामुळे भाडे ही बक्कळ मिळत असेलच मालकाला मग नक्की हे आता बंद का, की फक्त मला बंद वाटतंय लांबून? कदाचित असेल कोणीतरी राहत तिथे असा विचार करत करत ...

Social Media