माझ्या उभ्या
आयुष्यात कधी लेखन करेन असा वाटल नव्हत. म्हणजे लेखन भरपूर केलय, पण ते फक्त
शाळेतच. शाळेच्या बाहेर पहिल्यांदा लिहील ते कॉलेज च्या वार्षिक नियतकालिकासाठी.
त्या लेखनामुळे कौतुक झाल, मग ठरवल कि स्वतःचा ब्लॉग लिहायचा. सुरुवातीला नुसत ठरवलं
पण कृती कोणतीच केली नाही नुसताच विचार करत राहिलो. अगदी भारताच्या संसंदेसारख
म्हणजे एखाद्या विधेयकावर विचार करत बसायचं आणि जेव्हा वेळ निघू जाईल तेव्हा
त्याला मान्यता द्यायची. म्हणजे मी खूपच उशिरा लिहितोय असा नाही पण माझ्या मते खूप
लवकर लिहितोय असाही नाही.
आधी तर ब्लॉग
लिहायचा कसा ते सुद्धा मला माहीत नव्हतं मग google ची मदत घेऊन ते सुद्धा शिकलो. आणी तिसर्या सत्राच्या सुरुवातीला ब्लॉग लिहायला
सुरुवात केली. कायमच काय लिहायचं हे सुचत नाही आणि मग सुरुवात केली की आपोआप
सुचायला सुरुवात होते.
आता हेच बघा ना....
आज लिहायला सुरुवात केली तेव्हा काय लिहायचं हे अजिबात माहीत नव्हत पण मग काहीतरी
लिहायला सुरुवात केली आणि मग आता एक मोठा परिच्छेद तयार झालाय.
सुरुवातीला ह्या आजच्या विषयाला दिलेल्या नावाबद्दल थोडा बोलूया...
“ओळख”
थोडा उशीर झालाय ओळख करून द्यायला असा वाटत असेल ना तुम्हाला...? हो मला ही
तेच वाटतय...पण असो माझ्या बद्दल तुम्हाला काय ओळख करून द्यायची म्हणून आधी करून
दिली नाही पण आता असा वाटायला लागलाय की माझ्या ब्लॉग ची सगळ्यांना झाली पाहिजे
आणी त्यासाठी ही ‘ओळख’.
आज ५ महिने झाले ब्लॉग लिहितोय आणि हा माझा कदाचित १० – ११ वा ब्लॉग असेल.
पण इतक्या दिवसात एक गोष्ट लक्षात आलीय की लेखकान लिहीत राहिला पाहिजे, ते
चांगला आहे की वाईट आहे ते वाचकच ठरवतील, पण लिहिणा महत्वाच. मी सुद्धा मधले २
महिने काहीही लिहिला नाही पण मग असा वाटायला लागला की लिहिला पाहिजे कारण मी
लिहिला नाही तर माझ्या मित्रांना वाचायची सवय कशी लागेल... ;-) ;-) हा म्हणजे माझ
लिखाण काही खूप विचार करण्यासारख असत असा काही नाही पण तरीही....
Comments