लेखक जे काही लिहतो त्याच नवल तो सोडून इतर सगळ्यांना वाटत असत ... खर सांगू का? लेखकाला त्याच काहीच अप्रूप वाटत नसत. त्याच्यासाठी ते एखाद्या मराठीच्या पेपर मधल्या क्षुल्लक निबंधासारख असत ते. त्यामुळे जस परीक्षेत आपल्याला कळत नाही की निबंध काय लिहिला जातोय तसा लेखकाला सुद्धा काळात नसत की तो जे लिहितोय ते खरच इतर लोक वाचतील का? त्याच काम लिहीण आहे आणि आपल्यासारख्यांच काम ते वाचणं हे आहे. मघाशीच पु.ल. देशपांडेंच एक वाक्य वाचनात आल... कदाचित त्याच शीर्षक फसवणूक आणि हसवणूक अस होता पण वाक्याचा अर्थ समजून घेण खूप म्हत्वाच आहे असा मला वाटत. पु.ल. असा लिहितात, “जन्म आणि मृत्यू ह्या दोन टोकांमध्ये पकडून नियतिने चालवलेली आपणा सगळ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणार्या माणसांची ‘हसवणूक’ करण्यापलीकडे आणखी काय करायचं?” खरच बघा त्यानी त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा अर्थ ह्यात स्पष्ट केलाय अगदी. त्यांनी आयुष्यभर आपल्याला हसवलं आणि अजूनही त्यांची पुस्तकं, कथा आपल्याला अजून हसवतायत.
त्यानी आयुष्याची गाडी वेगळ्या पद्धतीने चालवली आणि ते यशस्वी झाले. जन्म ते मृत्यू असा प्रवास तर सगळेच करतात पण तोच प्रवास थोड्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वळणाने झाला तर त्याची मजा काही औरच...! असाच वेगळा प्रवास करताना जर आपण दुसर्याच्या पण उपयोगी पडलो तर ते ही उत्तमच.
मला तर स वाटत की विधात्याने माणूस तयार करतानाच त्याला स्वार्थी वृत्तीचा बनवलाय. कारण जन्मापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत प्रत्येक गोष्ट ही माणसाला आकर्षित करत असते आणि तो त्या गोष्टीला आपलास करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जो माणूस असा नसतो(एखादा अपवाद) तोच खर तर आपला विधाता असतो कारण तोच फक्त स्वतःचा विचार सोडून दुसर्याचा विचार करू शकतो. ह्यावरूनच व.पु.काळेंची एक कथा आठवतीये, कथेचे नाव आहे ‘जे.के.मालवणकर’. सगळी कथा सांगणं शक्य नाही पण आपल्या मुद्द्याशी सलग्न असलेला एक मुद्दा त्या कथेत आला म्हणून उदाहरणादाखल मांडतो. जे के मालवणकर महानगरपालिकेत नोकरीला असतात बरोबर १० तारखेला सगळ्यांचा पगार होतो. त्यांच्याच ऑफिस मधले त्यांचे सहकारी मित्र उदास होऊन बसलेले असतात कारण त्यांचा पगार चोरीला गेलेला असतो, प्रत्येक जण त्यांच्या जवळ जाऊन त्यांना सहान्भूते देत असत त्यांची विचारपूस करत असतात. अचानक जे.के.मालवणकर ऑफिस मध्ये येतात, मित्राच्या टेबल जवळ जातात आणि आपला सागळा पगार त्यांना देतात... इतर सगळे त्यांना विचारतात की जे.के.? तुम्ही असा का केलत? तेव्हा तो माणूस जे वाक्य बोलतो ते खरच विचार करण्याजोग आहे..तो म्हणतो, ”जेव्हा एखाद्याचा पगार चोरीला जातो तेव्हा पहिल्यांदा त्याला पगार द्यायचा असतो सहानभूती नाही.!“
असाच विचार प्रत्येकाने केला तर एखादा अडचणीत असताना आपण मागे-पुढे न बघता त्याला मदत केली तर? तर आपले काहेच वाईट होणार नाही उलट दीर्घकाळ टिकणारा फायदा होईल. ह्यासाठीच थोडा वेगळा जगुन बघा दुसरयांच्या उपयोगी पडा, तुम्हाला तुमच वय थोडा कमी झाल्यासारखं जाणवेल....
धन्यवाद....!

Comments