Skip to main content

मी, माझा ब्लॉग, आणि तुम्ही..


..
खूप अतूट नात आहे तुमच आणि माझ... ह्या ब्लॉग मुळ आपण भेटतो म्हणजे हा ब्लॉग सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे न?
लेखकाच्या आकांक्षेचा आणि महत्वाकांक्षेचा साक्षीदार असतो तो म्हणजे त्याने लिहीलेल्या लेखांचा, पुस्तकांचा वाचक...आणि वाचकाच्या भावना समजून उमजून त्याच्या मनात नवचैतन्य आणि आनंदाची नवीन भावना निर्माण करतो तो असतो लेखक.. म्हणजे बघा वाचक असेल तर लेखक जगेल आणि लेखक नसेल तर वाचकाच्या जीवनाचा अर्थच उरणार नाही.
हल्लीच्या काळात कोणी पुस्तक वाचत नाही म्हणून आपण कीतीही ओरड केली तरी पुस्तक वाचणार्यांची संख्या कमी होत नाही. मला तर असा वातातात्य की जे पुस्तक वाचताच नाहेत आणि ज्यांना वाटत की इतरांनीही ते वाचू नये ते असला आगाऊपणा करत असतात आणि आमच्यासारख्या भोळ्या भाबड्या नवलेखकांचे लेख वाचणाऱ्या वाचकांचे मन परावृत्त करतात.... तरीही असंख्य असे वाचक असतात जे आम्हाला अविरत प्रेरणा देत असतात. आणि भविष्यात सुद्धा देत राहतील...
मागच्याच महिन्यामध्ये माझ्या ह्या ब्लॉग चे   १००० views   कम्प्लीट झाले, याचा मला आनंद तर आहेच पण ह्या मुळे मिळालेल्या प्रेरणेने मी अधिक लेख तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकेन त्याचा उत्साह मला जास्त आहे. सहस्रपूर्तीच्या निमित्ताने तुमच्याशी थोडा वेगळा संवाद साधावासा वाटला त्यामुये हे थोडेसे वेगळे काहीतरी....
धन्यवाद... 

Shardul Narendra Mandrupkar

Comments

Nuanced Mind said…
This comment has been removed by a blog administrator.
Nuanced Mind said…
Always hungry to read good stuff..Thanks to u...
You're welcome brother

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

ते शेवटचे दिवस

आज class मध्ये बसून पण थोड एकट एकट वाटल. मुल थोडी कमीच होती, जी होती ती आपल्याच नादात होती पण मी तिथे एकटाच होतो. आज जाणवल , शेवटचा महिना, शेवटचे ३०-४० दिवस, college मधल्या त्या वातावरणात वेळ घालवायाची शेवटेची संधी. त्या बेंच वर बसून दंगा करायचे शेवटचे दिवस . कुठे कोणाशी झालेल भांडण मिटवायच असेल किंवा अबोला सोडायचा असेल तर शेवटचे सोनेरी दिवस.  मनात थोडी भीती वाटते आज... रोज सकाळी बस मध्ये बसून college च्या stop वर उतरायची सवय मोडावी लागणार काही दिवसात. Lecture तर दूर पण त्या बदाम चौकाततरी आपल्याला कोणी ओळखेल का? मित्रांना मुक्त पणे शिव्या देत फिरण्याचे दिवस संपणार.. lipton वर दर संध्याकाळी केलेला चहा- नाश्टा परत रोज नाही मिळणार. उमेश दादाशी गप्पा मारत घालवलेले दिवस college संपल्यावर पुन्हा कधी मिळणार ? ४:१५ नंतरची classtest आणि मध्येच मुसंडी मारणार्या midsem आपण परत कधीच नाही देणार.! Ground वरच्या बेंच वर बसून केलेला timepass परत नाहीच होणार! Lunch Break मध्ये डबा खाण्याचा बेत कदाचीत नाहीच करता येणार. नीरज्याच्या डब्यातील roll, वैभव च्या डब्यातल्या चपात्या, कुलदीप ची आवडती ट...

गोष्ट

 चला, आज खूप दिवसांनी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, गोष्ट म्हणजे कोणाची गोष्ट? तर ही गोष्ट आहे ती आहे एक घराची.  बेंगलोर मध्ये नव्याने नवीन भागात राहायला आल्यावर येताना जाताना दिसणारे एक छोटंसं जून घर. ज्या पाणीपुरी वाल्याकडे पाणीपुरी खायला जातो त्याच्या दुकानासमोर असलेलं. पाणीपुरी खात खात मी पाहात होतो की, ती जुनी घर असतात ना, तळमजल्यावर दुकान आणि वरती रहण्याजोग्या २-३ खोल्या, छप्पर शक्यतो पत्र्याच असतं बघा तसच हे घर. खाली किरणामालाच आणि सोबतच झेरॉक्स च दुकान आणि दुकानाची भिंत संपली की लागूनच वरती जायला जिना. ते बघता क्षणी माझ्या डोक्यात प्रश्न आला की कशी असेल ही छोटीशी इमारत ती उभी राहिली त्या वर्षात?  नवीन रंग असेल चमकत असेल कदाचित भागामध्ये हीच सुंदर दिसणारी एकुलती एक असेल बहुतेक. आजूबाजूच्या कॉलेज मधल्या विद्यार्थिनी किंवा नवीन बिऱ्हाड करणारे प्रोफेसर? किंवा एका खोलीत एक आणि एका खोलीत एक अशी दोन बिऱ्हाड? मुख्य रस्त्यावरच असल्यामुळे भाडे ही बक्कळ मिळत असेलच मालकाला मग नक्की हे आता बंद का, की फक्त मला बंद वाटतंय लांबून? कदाचित असेल कोणीतरी राहत तिथे असा विचार करत करत ...

Social Media