बदल ही काळाची गरज आहे, कारण जग हे सतत बदलत असते. आणि त्या जगाबरोबर जाण्यासाठी आपल्याला सुद्धा बदलणे गरजेचे असते. सध्याच्या काळात एकच गोष्ट बदलणे गरजेचे आहे ती म्हणजे देश. आपल्या देशात खूप गोष्टी चांगल्या आहेत तश्या खूप साऱ्या गोष्टी वाईट सुद्धा आहेत. आणि वाईट गोष्टी माणसं लगेच स्वीकारतात. काही माणसांना तर देश म्हणजे चहा सोबत गप्पा मारण्याचा विषय आहे असाच वाटत. पण त्यांना हे कळत नाही की , "देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण त्या देशाचे देणे लागतो" , स्वा. सावरकर. आणि लोकमान्य टिळकांनी तर म्हणलेलच आहे की देशकार्य हेच देवकार्य. पण देश बदलणार म्हणजे करणार तरी काय?! हा प्रश्न तुमच्या मनात आहे तसा माझ्याही मनात केव्हापासून घुटमळतोय. देश बदलायला आपल्याला कुठे लष्कराच्या भाकऱ्या भाजायला दिल्ली , मुंबई ला जायचं नाही आपल्याला स्वतः मध्ये बदल आणायचा आहे. कारण ह्या देशातला एक-एक व्यक्ती ह्या देशाला पुढे किंवा मागे न्यायला कारणीभूत होऊ शकतो. माणूस बदलला तर त्याच घर बदलत, घर बदललं तर त्याची गल्ली बदलते, त्या गल्लीच वारं शेजारच्या गल्ल्याना लागलं की गाव आपोआप बदलून जात. गाव - गाव करत करत पूर्ण जिल्हा बदललेला दिसतो, जिल्ह्या - जिल्ह्यातील चढाओढीमुळे राज्य बदलायला वेळ लागत नाही आणि ह्याचमुळे घर, गल्ली, गाव,जिल्हा, राज्य आणि राज्यापासून देश बदलायला वेळ लागत नाही. म्हणूनच स्वतः मध्ये बदल घडवणं खूप महत्त्वाचं असत.
उदाहरणा खातर एक वस्तुस्थिती पाहूया, आपल्या पंतप्रधान मोदींनी स्वच्छ भारत अभियान काढलं पण ते अभियान यशस्वी तेव्हाच होईल जेव्हा ह्या देशातला प्रत्येक माणूस स्वतः केलेला कचरा स्वतः कचऱ्याच्या पेटीत टाकेल, स्वतः च्या घरापुढचे अंगण झाडून काढेल. नुसतं २ ऑक्टोबर ला शाळेतल्या मुलांना गावात झाडायला नेऊन देश स्वच्छ होत नसतो. प्रत्येक देशबांधवाने कष्ट केले पाहिजेत आपला देश स्वच्छ करण्यासाठी.
एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ??
एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा, संरक्षण, आर्थिक बाबी पुरवत,आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो.
आपण पैसा कमावतो, मोठा बंगला बांधतो, गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार.
मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते, ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद
हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा युरोपला जावा लागणार नाही. आपल्या शास्त्रज्ञांना फक्त पैशासाठी बाहेरच्या कंपनीत नोकरी करावी लागणार नाही. कदाचित ह्या मुळे आपल्या देशातही Microsoft सारखी एखादी मोठी कंपनी तयार होईल. पण पुढच्या पिढीला हे सगळा द्यायचं असेल तर आपण आत्तापासूनच सतर्क होऊन फक्त आणि फक्त आपल्या देशासाठी जगल पाहिजे.

Comments