Skip to main content

एका चेहर्याची ओळख

            आज बस मध्ये थोडी कमीच गर्दी दिसली, मग मी पण बोर्ड बघून पटकन आत शिरलो. जास्तीत जास्त १० जण असतील बस मध्ये. पण त्या सगळ्यात एक चेहरा जास्त ओळखीचा वाटला. Campus activities मध्ये ज्या चेहर्याने माझ्या मनाला हेलकावे दिलेले तोच चेहरा मला जणू आज मला खुणावत होता. तिच्या शेजारची जागा मोकळीच होती. मला ही काही सुचलं नाही, मी जाऊन बसलो, तशी ती थोडी अवघडली. तिला कदाचित असा वाटलं असेल की कोण हा मुलगा आणि असा अचानक माझ्याच शेजारी का येऊन बसला? स्वाभाविक आहे, ओळख ना पाळख आणि अस न विचारता मी जाऊन बसलो. मग मीच थोडा ओशाळला झालो आणि थोडा अलीकडे सरकून बसलो. कानात headphone टाकला आणि किशोर कुमार चा अल्बम चालू केला. किशोरदांच्या त्या गितांनी काही वेळ मला विचलीत केलं पण पुन्हा मनात तीच येऊ लागली. "काढावी का ओळख?", "बोलावं का तिच्याशी", "तिला आवडल नाही तर?" फक्त प्रश्नच येत होते. इतक्यात कोणाचीतरी हाक आली. कानातल्या आवाजामुळं नीट ऐकू आल नाही पण मनातून सारख अस वाटत होतं की ही हाक नक्कीच तिने मारली असणार म्हणून अतिउत्साहाच्या भरात मी headphone काढून तिच्याकडे बघितलं तर ती तिच्या मोबाईल मध्ये डोकं खुपसून होती. आणि मग conductor जास्तच खेकसला, बिचारा पास पंच करायला मगाचपासून उभा होता.
              आता एव्हाना अर्धा रस्ता पार झालेला, पण मनातली घालमेल अजून चालूच होती. बोलू की नको बोलू हा एकच सवाल मनात घुटमळत होता. शेवटी धाडस केलं, तिच्याकडे बघितलं, योगायोगाने तिने पण माझ्याकडे बघितलं . तिनं माझ्याकडे बघितल यानेच दचकून मी पुढे बघायला लागलो. माझी तारांबळ तिच्या लक्षात आली, तिच्या ओठावर हलकेच हसू उमटलं आणि मलाही माझच हसू आलं. थोडा सावरून बसलो, इस्लामपूर आता जास्त लांब नव्हतं फार फार तर ३-४ किमी राहिले असतील पण अजूनही तिच्याशी बोलणं शक्य झालं नव्हतं. मनात असा पण विचार येत होता की परत अशी संधी येणे नाही पण मग एक मन अस पण सांगत होता की तिच्यामध्ये गुंतून माझा वेळ तर वाया घालवत नाही ना!
इस्लामपूर स्टँड मध्ये बस शिरली , मी पण जागेवरून उठलो आणि बस मधून उतरायला दरवाज्याजवळ गेलो. तिच्याकडे एक नजर फिरवली पण ती दिसलीच नाही. तेव्हापासून आजपर्यंत बस मध्ये बसल्यावर तिला माझी नजर हुडकते आणि मग परत विचार येतो, दिसली नाही तेच बरं झालं!

अर्झ किया है।

" जुल्फो मैं उसके वह नशा चढ गया है।
दर्द ए दिल की जैसे दवा बन गया है।
ख्वाहिश् है, अरमान भी तो हैं मन मैं।
लफझो को जुबाँ पर लाने का बस ऐतबार हैं। "

Comments

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

ते शेवटचे दिवस

आज class मध्ये बसून पण थोड एकट एकट वाटल. मुल थोडी कमीच होती, जी होती ती आपल्याच नादात होती पण मी तिथे एकटाच होतो. आज जाणवल , शेवटचा महिना, शेवटचे ३०-४० दिवस, college मधल्या त्या वातावरणात वेळ घालवायाची शेवटेची संधी. त्या बेंच वर बसून दंगा करायचे शेवटचे दिवस . कुठे कोणाशी झालेल भांडण मिटवायच असेल किंवा अबोला सोडायचा असेल तर शेवटचे सोनेरी दिवस.  मनात थोडी भीती वाटते आज... रोज सकाळी बस मध्ये बसून college च्या stop वर उतरायची सवय मोडावी लागणार काही दिवसात. Lecture तर दूर पण त्या बदाम चौकाततरी आपल्याला कोणी ओळखेल का? मित्रांना मुक्त पणे शिव्या देत फिरण्याचे दिवस संपणार.. lipton वर दर संध्याकाळी केलेला चहा- नाश्टा परत रोज नाही मिळणार. उमेश दादाशी गप्पा मारत घालवलेले दिवस college संपल्यावर पुन्हा कधी मिळणार ? ४:१५ नंतरची classtest आणि मध्येच मुसंडी मारणार्या midsem आपण परत कधीच नाही देणार.! Ground वरच्या बेंच वर बसून केलेला timepass परत नाहीच होणार! Lunch Break मध्ये डबा खाण्याचा बेत कदाचीत नाहीच करता येणार. नीरज्याच्या डब्यातील roll, वैभव च्या डब्यातल्या चपात्या, कुलदीप ची आवडती ट...

गोष्ट

 चला, आज खूप दिवसांनी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, गोष्ट म्हणजे कोणाची गोष्ट? तर ही गोष्ट आहे ती आहे एक घराची.  बेंगलोर मध्ये नव्याने नवीन भागात राहायला आल्यावर येताना जाताना दिसणारे एक छोटंसं जून घर. ज्या पाणीपुरी वाल्याकडे पाणीपुरी खायला जातो त्याच्या दुकानासमोर असलेलं. पाणीपुरी खात खात मी पाहात होतो की, ती जुनी घर असतात ना, तळमजल्यावर दुकान आणि वरती रहण्याजोग्या २-३ खोल्या, छप्पर शक्यतो पत्र्याच असतं बघा तसच हे घर. खाली किरणामालाच आणि सोबतच झेरॉक्स च दुकान आणि दुकानाची भिंत संपली की लागूनच वरती जायला जिना. ते बघता क्षणी माझ्या डोक्यात प्रश्न आला की कशी असेल ही छोटीशी इमारत ती उभी राहिली त्या वर्षात?  नवीन रंग असेल चमकत असेल कदाचित भागामध्ये हीच सुंदर दिसणारी एकुलती एक असेल बहुतेक. आजूबाजूच्या कॉलेज मधल्या विद्यार्थिनी किंवा नवीन बिऱ्हाड करणारे प्रोफेसर? किंवा एका खोलीत एक आणि एका खोलीत एक अशी दोन बिऱ्हाड? मुख्य रस्त्यावरच असल्यामुळे भाडे ही बक्कळ मिळत असेलच मालकाला मग नक्की हे आता बंद का, की फक्त मला बंद वाटतंय लांबून? कदाचित असेल कोणीतरी राहत तिथे असा विचार करत करत ...

Social Media