काय बोलावे मला कळतच नाही,
की ऐकावे नुसते ते सुचतच नाही..
अवघे सारे दुःख माझे व्यक्त कधी होत नाही,
परक्याच्या ह्या वेदेनेचे अर्थच मुळी समजत नाही...
विषय गंभीर तरी बेजार सर्व काही सुन्न सुन्न,
उमजत नाही तसं आता बोलावे की ऐकावे हे सुचतच नाही...
कोण मजला पाहिले अन बोलले की त्रस्त आहे,
माहिती रे त्रस्त मी तरी उपाय कोणी सुचवला एकही नाही!
पाहिजे ते पाहिले प्रत्येकाने, दुवा मी जोडवला नाही,
पाहिले पण योग्य तो पाठिंबा मज लाभला नाही...!
हा की तो, मी पाहूनी थकलो आता,
हा की तो, की मी ह्यातच अडकलो आता,
संपले नाही जीवन तरी अडखळला प्राण माझा...
हाच आहे का प्रसंग, संपते अनंत इथे नाही?
Comments