Skip to main content

लिहितात नक्की कसं?

 काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं.

एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत.

खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं?

कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल?

म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही.

हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे.

आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो आणि चालू होतो शब्दांच्या जुळवाजुळवीचा खेळ.

एक वाक्य पुढच्या वाक्याच्या reference नी असल पाहिजे आणि मुख्य म्हणजे जसं ते डोक्यात आहे तसच्या तस टाईप झालं पाहिजे. आणि त्यात सुद्धा हल्लीच्या लोकांचा petience एवढा जास्त आहे की वाचक कंटाळून जाऊ नये म्हणून वेगळीच भीती. 

सातत्य पाहिजे, रोज लिहिलं पाहिजे, किमान आठवड्यातून एकदा असा विचार करून आणि नियोजन करून झोपल की दुसऱ्यादिवशी पुन्हा ये रे माझ्या मागल्या. पुन्हा तेच, काय लिहायचं.

जेव्हा काय लिहायचं हा प्रश्न सुटतो तेव्हा चालू होते काळजी कसं लिहायचं ह्याची. खुप अगदी हजारो पुस्तक वाचलीत अश्या लोकांपैकी मी नाही (म्हणजे अगदीच वाचत नाही असा नाही पण अगदीच त्यात बुडून जात नाही) असं असल्यामुळे शब्द आणि त्यांची जुळवाजुळव ह्यातच अर्धा वेळ जातो. सगळे शब्द बरोबर जमले की मग वाक्यरचना, व्याकरण, टायपिंग मिस्टेक वगैरे सगळे सोपस्कार करून शेवटी एकदा proof reading मग त्यात डोक्यात ज्या पद्धतीने आपल्याला वाक्य वाटत होती तशी नाहीत म्हणून पुन्हा सगळं erase करून पुनश्च हरी ओम. ही सगळी प्रक्रिया ३-४ वेळा आणि मग शेवटी बनवतो तो एक लेख किंवा एक ब्लॉग. मोबाईल वर टाईप करताना खूप मोठा वाटणारा लेख ब्लॉगर क्या साईट वर paste केला की अगदीच छोटा दिसतो पण मग तो वाढवयसाठी अजून शब्द शोधावे लागणार ह्या विचारानं तो लेख तसाच पोस्ट होतो, जसा आता होणार आहे तसा.

ह्या माझ्या ब्लॉग लिहिण्याच्या प्रोसेस मध्ये फक्तं एकच प्रयत्न प्रामाणिक असतो तो म्हणजे वाचनाऱ्याच्या मनापर्यंत पोचणे आणि पोचत नसेल तर तिचं त्या लेखकाची हार.


टीप :- काही सुधारणा हव्यात असं तुम्हाला नक्की वाटत असणार पण ते फक्त मला सांगायचं राहून गेलं असणार, ते खाली comment मध्ये लिहू शकता, किंवा मला मेल करू शकता (mandrupkarshardul4@gmail.com)





Comments

Popular posts from this blog

ते शेवटचे दिवस

आज class मध्ये बसून पण थोड एकट एकट वाटल. मुल थोडी कमीच होती, जी होती ती आपल्याच नादात होती पण मी तिथे एकटाच होतो. आज जाणवल , शेवटचा महिना, शेवटचे ३०-४० दिवस, college मधल्या त्या वातावरणात वेळ घालवायाची शेवटेची संधी. त्या बेंच वर बसून दंगा करायचे शेवटचे दिवस . कुठे कोणाशी झालेल भांडण मिटवायच असेल किंवा अबोला सोडायचा असेल तर शेवटचे सोनेरी दिवस.  मनात थोडी भीती वाटते आज... रोज सकाळी बस मध्ये बसून college च्या stop वर उतरायची सवय मोडावी लागणार काही दिवसात. Lecture तर दूर पण त्या बदाम चौकाततरी आपल्याला कोणी ओळखेल का? मित्रांना मुक्त पणे शिव्या देत फिरण्याचे दिवस संपणार.. lipton वर दर संध्याकाळी केलेला चहा- नाश्टा परत रोज नाही मिळणार. उमेश दादाशी गप्पा मारत घालवलेले दिवस college संपल्यावर पुन्हा कधी मिळणार ? ४:१५ नंतरची classtest आणि मध्येच मुसंडी मारणार्या midsem आपण परत कधीच नाही देणार.! Ground वरच्या बेंच वर बसून केलेला timepass परत नाहीच होणार! Lunch Break मध्ये डबा खाण्याचा बेत कदाचीत नाहीच करता येणार. नीरज्याच्या डब्यातील roll, वैभव च्या डब्यातल्या चपात्या, कुलदीप ची आवडती टोमॅट

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य

Fear of Success

              Life is not simple but its not even impossible to live. Its not like we can just feel it, It is what we see everyday, what we speak everyday, how we behave, how we express. Life is a game of hurdles. To win, you have to cross every difficulty which come in your way. But if you keep thinking how your life is gonna respond to your situation then that's the point where you will lose. Because one wise man once said and I quote, "Life is tragedy to those who thinks but comedy to those who feels..!!!" It is not necessary to always think before you act but beauty of life depends on your reactions on other's action.              Life is only game where "losing" is not an option. Here, you neither lose nor always win. Everyone actually want to achieve success or something extra-ordinary in thier lives but not everyone gets what he desires. There is one thing which I have observed that people never fear of failure but actually they fear of success. Th

Social Media