काही नद्या सरोवरालाच जाऊन मिळतात , नियतीच तशी असते मग गाळ साचत राहतो आणि बांध फुटत जातात , डोंगर पाण्याखाली जातो , आणि तिकडं समुद्र कोरडाच राहतो , त्याची व्यथा , त्याचा आक्रोश , त्याची निराशा त्याची त्यालाच कळते . (मनन © ) नुसतीच 4rth सेम संपली होती . सुट्टीत काही ताण नसतो , निवांत असायचो , मित्रां बरोबर वेळ मजेत चालला होता , आम्ही 5 मित्र मी ( ओंकार ), आकाश , शुभम , ऋषी आणि सुमित ... नेहमी एकत्रच .... आपलं ठरलं होत ... सकाळी क्रिकेट खेळायचं , संध्याकाळ झाली कि बागेतल्या बाकड्यावर जाऊन पडायच ... असं खास काही न्हवता तिथं ... कॉलनी च्या गेट मधून आत आलं कि डाव्या बाजूला होती .. एका बाजूला लहान मुलांना खेळायला जागा होती घसरगुंडी , पाळणा आणि काय काय होत ..... दुसऱ्या बाजूला बाकडी आणि त्या बाकड्यावर पाचवीला पुजलेले कॉलोनीतली म्हातारे - म्हातारी .... तर तिथं आम्ही कायम पहुडलेलीच .... असच एका संध्याकाळी तिथं बसलो होतो ... तेवढ्यात गेट मधून रिक्षा आत आली , आत कोणी तरी...