Skip to main content

Posts

Showing posts with the label father

बाबा

 कर्तृत्व सगळेच करतात, पण त्याच कौतुक ज्यानी करावं असं वाटत त्या माणसाला कसं सांगायचं याच कोड पडत. आयुष्यभर त्यांनी ज्या कंपनी ची गाडी वापरली, आणि ज्याचं नाव खूप प्रसिद्ध आहे अशा कंपनी मध्ये आपला मुलगा काम करतो हे किती मोठ आहे हे त्यांना कदाचित जास्त जाणवलं असत.  आज ४ जी ४.५ वर्ष झाली, त्यांचा आवाज ऐकायला, त्यांच्या नंबर वरून फोन यायला अजूनही डोळे, हात, कान ,डोकं, अगदी मोबाईल सुद्धा तरसतोय. कोणीही कितीही हक्क सांगावा आपल्यावर पण त्यांचा हक्क कोणाला देता येत नाही.  देव कधी कधी आपल्याला खूप कठीण प्रश्नावर उत्तर शोधायला लावतो. परीक्षेत out of syllabus काही प्रश्न आले तर त्याचे grace mark मिळतात पण आयुष्यात जे out of syllabus प्रश्न येतात त्यावर कोणतीच सवलत मिळत नाही.  भल्या मोठ्या घरातून थेट आपल्याला गेट च्या बाहेर उभा केलं जात आणि सांगितलं जात की आता ह्याची राखण तू करायची. घरात राहणाऱ्या प्रत्येकाची देखभाल करायची, नवीन कोणी आलं तर त्यालाही जमवून घ्यायचं, आता ह्या घराच छत तू व्हायचं.  ह्याच training कुठे मिळत नाही, ह्याच शिक्षण नसत. अगदी phd करा तुम्ही पण ह्याची शि...

Social Media