उन्हाळ्याची सुटी आम्हालाही हवी आहे, वर्षभराच्या थकव्यासाठी महिन्याची तरी रजा हवी आहे. शाळेच्या सुट्टीसारखं नको work from home, वेळ हवाय मोकळा, नको meeting ची बोंब. निवांत हवं जीवन, आणि दुपारीही झोप हवी, खर तर ती शाळेसारखी उन्हाळ्याची सुट्टी हवी. हा लागूदे निकाल १ मे ला तयार आम्ही आहोत, लेखी नसली तरी परीक्षाच असते, हे सर्व जाणून आहोत. अशी सुट्टी मिळाली की उन्हा तान्हा त खेळायला ही खूप ताकत येईल. हरवलेले सोबती जेव्हा खेळायला हाक मारतील, किती मजा येईल?! ससेमिरा नको कामाचा, deadline वगैरे भानगड नको, नको तो AC आणि भली मोठी बिल्डिंग ही नको. दिवसभर खेळून खेळून पोटात जेव्हा कावळे कोकलतील, घरी केलेल्या आमरसाला तेव्हाच खरे तर चव येईल. फ्रिज वगैरे नको काही, थंड माठातल पाणी मिळेल, आइस्क्रीम, पेप्सी नको काही, बर्फाच्या गोळ्यानेच पोट भरेल. बंद ऑफिस च्या दाराकड मग महिनाभर बघणार नाही, काम वगैरे नंतर, लॅपटॉप charging लाही लावणार नाही. देवा एवढच कर, एक वेळ लहान पण परत नाही दिलेस तरी चालेल, फक्त उन्हाळ्याची सुट्टी दे, लहान पण आम्हाला आपोआप मिळेल. 🔗 उन्हाळ्याच्या मजेशीर आठवणी इथे वाचा!