माझ घर आणि घरासमोरच छोटस अंगण! गावातल्या मोजक्याच जुन्या घरांपैकी ते एक. अंगणात खेळता खेळता आम्ही पाहीलेले निसर्गाचे अनेक अवतार. कायम पावसाळ्यात नदी काठच्या मित्रांना घरी रहायला बोलावून त्यांच्या सोबत नदीत सोडलेल्या कागदाच्या होड्या. आज सगळ आठवल, घर बांधल्यापासून आज पहिल्यांदा नदी उंबरठ्यावर आली आणि पाणी घरात शिरू लागल. आत्तापर्यंत आपण इतरांना मदत करत होतो आणि आता आपल्याला सुद्धा मदतीची गरज लागणार आहे ही भीती स्वस्थ बसू देइना. तेवढ्यात एक बोट मदत घेऊन आली, बोटीत ३ च जागा, दुसरी बोट केव्हा येइल हे माहीत नाही, अश्या परिस्थितीत बायको आणि आई वडीलांना बोटीत बसवून मी पुढच्या मदतीसाठी वाट बघायच ठरवल. ती बोट निघून गेली. पहिल्या दिवशी काहीच विशेष वाटल नाही पण जस जस रात्र होऊ लागली तस तस पावसाचा जोर वाढला. आणि तो वाढतच गेला, रात्री झोपेत पायाला पाणी लागल आणि मग समजल की पाणी आता घरात कंबरेएवढ आलय. गादी पुर्ण भिजली आणि मी पळत पळत पहिल्या माळ्यावर गेलो. रात्री झोप नाहीच, मोबाईल वरून जमेल त्याला कॉल करू लागलो पण नेटवर्क ने जीव कधीच सोडलेला. परिस्थीती हाताबाहेर जाते अस वाटायला लागल म्हणून पत्र्याव...