पू ल म्हणतात की, " काही लोकांची वागण्याची तऱ्हाच अशी असते की त्यांच्या हातात मद्याचा पेला देखील खुलतो " ह्याच काही लोकांच्यात तुझी गणना होते. " बास की बंगलोर आता या पुण्यात" तू म्हणून म्हणून दमलास पण अजूनही ते जमलं नाही. अजूनही वाटत call करावा आणि पोटभरून शिव्या द्याव्यात तुला. call केल्यावर कायम " काय साहेब कुठ हाय, काय कुठ पत्ता" अस तू विचारणार आणि मी कायम "हाय की इथच तुम्ही कुठाय पुणे का इस्लामपूर" अस म्हणून वाक्य तोडणार. शाळेत असल्यापासून तुझी मापं काढल्याशिवाय दिवस गेला नाही. तू आणि तुझ logic कायम next level. International tourism and Hospitality Management असा काहीतरी मोठ्या नावाचा course करायला गेलास आणि सुट्टीला samsung चा tab नाचवत यायचास. एकदा असाच मुंबई ला होतास आणि आपल्या "तात्या विंचू fan club" वरती मेसेज टाकलास "मला कसतरी होतंय" ह्या मेसेज वर सगळ्यांनी मिळून काय मापं काढली तुझी... २ दिवसांनी कळलं की तुला admit केलय आणि पांढऱ्या की लाल कोणत्यातरी पेशी कमी झाल्यात. तेव्हा जस गोसवीच्यात admit झालेलास आणि तिथून बर...