शाळा सुटायला आली की दप्तराकडे जाणारे हात, त्यात भरल्या जाणारी वह्या आणि पुस्तकांची गर्दी आणि सगळ्यांनी दप्तर भरलेले बघून सरानी म्हणावे की "मी अजून १५ मिनिटे शिकवणार आहे" किती राग यायचा ना? किती शिव्या दिल्या असतील त्या सरांना! पहिली पासून दहावी पर्यंत अशा घटना जवळपास आठवड्यातून ३-४ वेळा तर घडायच्याच. शेवटचा तास अभ्यासिकेसाठी राखून ठेवायला शाळेने सुरु केल तेव्हा पासून हा दुसरा त्रास थोडा कमी झाला. असे अनेक प्रसंग असतात, शाळेत वर्गात घडलेले, ग्राउंडवर खेळताना धडपडलेले, गृहपाठाची वही घरी विसरून आलेले आणि कधी परिपाठाच्या वेळी शाळेसमोर थाटात उभे असलेले पण ह्या सगळ्यात शिक्षक ही एक व्यक्ती constant असते. गणित शिकवणारे, इंग्रजी शिकवणारे, अगदी drawing शिकवणारे सुद्धा सगळे एकच! त्यांची रूप वेगवेगळी. जस देवाच असत ना तसच ! प्रत्येकाचा विषय वेगळा असतो पण ध्येय एकच असत, "मुलाला घासून पुसून लक्ख करून ह्या जगात वावरायला तयार करणे" फक्त ह्या देवासाठी कोणताच उपवास किंवा पूजा करावी लागायची नाही कारण शिक्षकाकडे काही मागण्याची गरज च नव्हती, जे असायच ते त्यांनी खुल्या हाताने आण...