शाळा सुटायला आली की दप्तराकडे जाणारे हात, त्यात भरल्या जाणारी वह्या आणि पुस्तकांची गर्दी आणि सगळ्यांनी दप्तर भरलेले बघून सरानी म्हणावे की "मी अजून १५ मिनिटे शिकवणार आहे"
किती राग यायचा ना? किती शिव्या दिल्या असतील त्या सरांना!
पहिली पासून दहावी पर्यंत अशा घटना जवळपास आठवड्यातून ३-४ वेळा तर घडायच्याच. शेवटचा तास अभ्यासिकेसाठी राखून ठेवायला शाळेने सुरु केल तेव्हा पासून हा दुसरा त्रास थोडा कमी झाला.
असे अनेक प्रसंग असतात, शाळेत वर्गात घडलेले, ग्राउंडवर खेळताना धडपडलेले, गृहपाठाची वही घरी विसरून आलेले आणि कधी परिपाठाच्या वेळी शाळेसमोर थाटात उभे असलेले पण ह्या सगळ्यात शिक्षक ही एक व्यक्ती constant असते.
गणित शिकवणारे, इंग्रजी शिकवणारे, अगदी drawing शिकवणारे सुद्धा सगळे एकच! त्यांची रूप वेगवेगळी. जस देवाच असत ना तसच !
प्रत्येकाचा विषय वेगळा असतो पण ध्येय एकच असत,
"मुलाला घासून पुसून लक्ख करून ह्या जगात वावरायला तयार करणे"

फक्त ह्या देवासाठी कोणताच उपवास किंवा पूजा करावी लागायची नाही कारण शिक्षकाकडे काही मागण्याची गरज च नव्हती, जे असायच ते त्यांनी खुल्या हाताने आणि मुक्त कंठाने विद्यार्थ्यांना देउ केलेल असायच.
मार तसा मिळायचाच पण त्याच्या मागे शिक्षकाची भावना त्या वयात उमगायचीच नाही. गदिमा म्हणतात ना,
"आधी तुडवी, तुडवी,
मग हाते कुरवाळी
ओल्या मातीच्या गोळ्याला
येई आकृती वेगळी"
कुंभारासारखच आपल्याला पण तुडवायला लागतच मगच येणारा आकार खुलून दिसतो.
मला तर अजुनही वाटत की जर इंग्रजीच्या तासाला मॅडम नी शब्द चुकल्यावर छडी दिली नसती तर कदाचित आंग्लभाषेसोबत कधीच सूत जमल नसत.
शाळेतल्या शिक्षकांच वेगळच काहीतरी वलय असत, कॉलेज मधे कितीही मोठे विद्वान प्राध्यापक असले तरी शेवटी शाळेत पाठीवर दोन गुद्दे देउन पाढे पाठ करायला लावणाऱ्या सरांची सर येतच नाही. शाळेसमोरून जातानासुद्धा दुपारी मिळणाऱ्या भाताचा वास येतो आणि आत जाऊन यायचा मोह आवरता येत नाही.
एवढ्या वर्षानंतर शाळा बदलते, शिक्षक बदलतात, शाळेचे नियम बदलतात पण तिथे गेल्यावर जग जेवढ निर्मळ आणि निरागस भासत ते कायम तसच राहत !!
आयुष्यात वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या रूपात वेगवेगळे शिक्षक भेटतात आणि एवढ शिकून घेता येत आणि तरीही शिक्षक दिन साजरा करताना शाळेतल्या शिक्षकांची च आठवण येते! कारण ती नाळ तशीच असते "Constant"
Comments