परिस्थिती चांगली म्हणावं तर तसही नाही आणि वाईट म्हणावं असाही नाही. घरची ओढ, आणि नोकरी ह्याच्या मध्ये अडकलेली ही अवस्था. Work From Home हे शब्द ऐकले की काय आठवत आपल्याला? कोरोना? लॅपटॉप? की आरामात बसून केलेलं काम? विचार करायला खूप सोपी पण अमलात आणायला थोडी शी किचकट संकल्पना आहे ना ही. बघणाऱ्याला थोडं सोपं वाटेल, सहज वाटेल पण मुळात जो जगतो त्यासाठी कदाचित अवघड असेल. आणि त्यात family सोबत नसाल तर थोडं अजून कष्टाच असेल. रोज सकाळी उठणं, आवरून meeting attend करणं. Meeting होता होताच 12 वाजतात मग स्वयंपाकाला लागणं. (हो माझाही हातभार असतो बनवण्यात😉) करून झालं की जेवायचं आणि मग परत कामावर बसायचं. एवढं सगळं होईपर्यंत २ वाजलेले असतात. आणि अर्धा दिवस संपलेला देखील असतो. आणि ह्या सगळ्यात शेजारी राहणार कुटुंबात रोज काहीतरी चमचमीत बनत आणि आमच्या नाकाला उगाचच त्रास देऊन जात. माझं गाऱ्हाणं सांगत नाही फक्त परिस्थिती सांगतोय. ह्या कोरोना मूळ खूप काही शिकायला मिळालं. स्वयंपाक ही फक्त एक बाजू. घराला संभाळण्यापासून अगदी भाजी आणणे, किराणा सामान भरणे आणि महत्वाचं म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं आणि तेच वा...