Skip to main content

Work From Home

परिस्थिती चांगली म्हणावं तर तसही नाही आणि वाईट म्हणावं असाही नाही.
घरची ओढ, आणि नोकरी ह्याच्या मध्ये अडकलेली ही अवस्था.
Work From Home
हे शब्द ऐकले की काय आठवत आपल्याला?
कोरोना?
लॅपटॉप? की आरामात बसून केलेलं काम?
विचार करायला खूप सोपी पण अमलात आणायला थोडी शी किचकट संकल्पना आहे ना ही.
बघणाऱ्याला थोडं सोपं वाटेल, सहज वाटेल पण मुळात जो जगतो त्यासाठी कदाचित अवघड असेल.
आणि त्यात  family सोबत नसाल तर थोडं अजून कष्टाच असेल.
रोज सकाळी उठणं, आवरून meeting attend करणं.
Meeting होता होताच 12 वाजतात मग स्वयंपाकाला लागणं. (हो माझाही हातभार असतो बनवण्यात😉)
करून झालं की जेवायचं आणि मग परत कामावर बसायचं.
एवढं सगळं होईपर्यंत २ वाजलेले असतात. आणि अर्धा दिवस संपलेला देखील असतो.
आणि ह्या सगळ्यात शेजारी राहणार कुटुंबात रोज काहीतरी चमचमीत बनत आणि आमच्या नाकाला उगाचच त्रास देऊन जात.
माझं गाऱ्हाणं सांगत नाही फक्त परिस्थिती सांगतोय.
ह्या कोरोना मूळ खूप काही शिकायला मिळालं.
स्वयंपाक ही फक्त एक बाजू. घराला संभाळण्यापासून अगदी भाजी आणणे, किराणा सामान भरणे आणि महत्वाचं म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं आणि तेच वापरणे. 
आपल्या मित्रांच्यातले विविध गुण, कला (पाककला सुद्धा)
अगदी घर स्वच्छ ठेवण्यापर्यंत सगळं.
एरवी घर सांभाळत job करणाऱ्या स्त्रिया आपन बघतो, त्यांच्याबद्दल ऐकतो, त्या कस करत असतील आणि त्यांना काय काय करावं लागतं असेल ह्याच साक्षात practical मिळालं ह्या कोरोना/locdown मुळे. 
घरी राहून घरच्या जेवणाला नाव ठेवताना, ती एक चपाती करायसाठी सुद्धा किती कष्ट असतात ते स्वतः करतानाच कळत नाहीतर नेहमी (आज चपाती नीट नाही झाली) ही तक्रार असतेच आपली.
ह्या सगळ्याची सुरुवात होते ती कणिक मळण्यापासून, पाणी जास्त झालं, पाणी कमी पडल, पीठ जास्त झालं अश्या अनेक गोष्टी घडतात पण तक्रार करताच येत नाही कारण करणारे आपणच असतो.
भाजीत मीठ कमी झालं आणि हळद जास्त पडली तरी खावचं लागत कारण ते आपणच केलेलं असत.
कांदा कापताना डोळ्यातून पाणी येत हे सगळ्यांनी ऐकलंय आपण पण नक्की किती पाणी येत ह्याचा अनुभव सुद्धा ह्या lockdown ने दिला.
जेवण, साफसफाई वगैरे करत काम करावं लागतं हा एक lockdown चा तोटा आहे. (काम आहे आपल्याकडे हे समाधानसुद्धा आहे)
कारण office वरुन घरी आल्यावर आपलं काम थांबतं, पण ह्या work from home मध्ये आपण २४ तास घरीच असतो त्यामुळे २४ तास कामासाठी available असतो.
कधीही फोन आला तरी काम करावं लागतं. (कधीही)
एवढं सगळं जमत कारण सगळे एकत्र होऊन करतो, कोणाच्या चांगल्या वाईट गोष्टी ना बघता, प्रत्येकाचं contribution ह्या परिस्थितीत तग धरून ठेवायला धाडस देत .
आणि मग कधीतरी मधूनच पावसाच्या वातावरणात चहा ची तलफ लागते आणि घरची आठवण येते.
डोळे बंद होतात आणि मन घराच्या चहाची चव आठवण्यात भरकटत.
मागून कोणीतरी हाक मारत आणि मग परत back to reality.
बाकी सगळं routine आहे तस चालू होतं आणि घराची आठवण आवाक्याबाहेर जायच्या आधी रात्रीच्या स्वयंपाकाची वेळ येते.
आणि उधाण झालेलं मन कणिक मळताना हातातल्या पिठात मिसळून जात.

(टीप: तुमचं काय work from home आहे, म्हणजे निवांत, अगदी आडवं पडून काम असं वाटणाऱ्यानी एकदा असं राहून बघितलंच पाहिजे!)

Photo by cottonbro from Pexels

Comments

Sacchidanand said…
locdown ni tula workout karayla pn shikawal...Te lihaych wisarlas...faluda biluda...
Te pudhachya part madhe lihaych ahe

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

माणूस ओळखायचं गणित

 काहीतरी चुकतंय. माणूस ओळखायला? की माणूस जाणून घ्यायला? कुठेतरी काहीतरी हरवतेय,  मनाच्या कोपऱ्यात शंकांचं काहूर माजतय आणि सैरभैर होऊन चित्त थळ्यावरून हल्लय. काहीच सुचत नाही, कोण कसे आणि कोण कसे... नक्की ओळखायचं तरी कसं? पारखायच कसं की भेटणारा रोज बोलणारा आपला म्हणायचा तो माणूस आपलाच का? काहीतरी वेगळं पाहिजे ना? वेगळी नीती, वेगळी पद्धत? माणसं ओळखायची?? एक टूलकिट वगैरे सारखं म्हणजे कसं माणसं ओळखता येतील. कोणीतरी पुढे येऊन ये करायला पाहिजे, एक पद्धत बनवून सगळ्यांचच कल्याण केलं पाहिजे. कधी कधी कोड च पडत की हा समोर बसलेला माणूस जो आपल्याशी प्रेमाने बोलतोय, आपल्या जवळ येतोय तो नक्की मनातून आपलाच विचार करतोय का? आपल्याच भल्याचा विचार करतोय की फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतोय? कुठून येतं ते तंत्र जिथे माणसं ओळखायची कला अवगत होती? "बघितल्या बघितल्या मी ओळखलं होत, हा किंवा ही कशी आहे ते" हे बघितल्या बघितल्या ओळखायचं skill येतं कुठून? आणि कसं शिकायचं?  मला पण शिकायचंय, माणसं ओळखायला आणि जश्यास तस वागायला, परिस्थिती बघून पलटी मारणाऱ्या आणि नको तेव्हा इगो मोठा करून फुगून बसणाऱ्या, आ...

लिहितात नक्की कसं?

 काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं. एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत. खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं? कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल? म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही. हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे. आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो ...

Social Media