कर्तृत्व सगळेच करतात, पण त्याच कौतुक ज्यानी करावं असं वाटत त्या माणसाला कसं सांगायचं याच कोड पडत.
आयुष्यभर त्यांनी ज्या कंपनी ची गाडी वापरली, आणि ज्याचं नाव खूप प्रसिद्ध आहे अशा कंपनी मध्ये आपला मुलगा काम करतो हे किती मोठ आहे हे त्यांना कदाचित जास्त जाणवलं असत.
आज ४ जी ४.५ वर्ष झाली, त्यांचा आवाज ऐकायला, त्यांच्या नंबर वरून फोन यायला अजूनही डोळे, हात, कान ,डोकं, अगदी मोबाईल सुद्धा तरसतोय. कोणीही कितीही हक्क सांगावा आपल्यावर पण त्यांचा हक्क कोणाला देता येत नाही.
देव कधी कधी आपल्याला खूप कठीण प्रश्नावर उत्तर शोधायला लावतो. परीक्षेत out of syllabus काही प्रश्न आले तर त्याचे grace mark मिळतात पण आयुष्यात जे out of syllabus प्रश्न येतात त्यावर कोणतीच सवलत मिळत नाही.
भल्या मोठ्या घरातून थेट आपल्याला गेट च्या बाहेर उभा केलं जात आणि सांगितलं जात की आता ह्याची राखण तू करायची. घरात राहणाऱ्या प्रत्येकाची देखभाल करायची, नवीन कोणी आलं तर त्यालाही जमवून घ्यायचं, आता ह्या घराच छत तू व्हायचं.
ह्याच training कुठे मिळत नाही, ह्याच शिक्षण नसत. अगदी phd करा तुम्ही पण ह्याची शिकवणी काय पण साधा crash course देखील मिळत नाही.
काल दुपारी अचानक भीती वाटली की बाबा एवढे लांब गेले का की आता त्यांचा आवाज ही विसरायला होतोय? सगळे सांगतात move on करायचं. पण एक म्हण आहे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, जोपर्यंत आधार आहे हा एक confidence असतो तोपर्यंत कोणताही धाडस करायला काहीच वाटत नाही पण तो आधार एकदम गेला तर? अडखळतोच ना माणूस?
पण तस होऊन चालत नाही, मनातून कितीही भीती वाटत असली तरी आता अंधारात वाट शोधावी लागते, आपण किती strong आहोत हे दाखवाव लागत नाहीतर सगळ घर कोसळत आणि बाहेरचे वारे आत घुसून धुमाकूळ घालून जातात.
अडचणीत बाबा आठवतात पण त्यांच्या साठी जे काय काय करायचं होत, त्यांना काय काय करून दाखवायचं होतं ते करताच आलं नाही हे digest होतंच नाही. अजुनही वाटत की बाबांचा एक कॉल यावा आणि त्यांनी म्हणावं मी आहे तू कर. मी सगळ लढायला तयार आहे पण फक्त त्यांनी येऊन म्हणावं की तू लढ.
मी कायम प्रयत्न करत राहीन त्यांनी जस सगळ सांभाळलं तसच सांभाळायचा, कधीही न तुटायचा पण कधी कधी येतात असे प्रसंग की तेव्हा बाबा तुम्ही हवा होतात.
तुम्ही एकदा फक्त या आणि बोला माझ्याशी, मला सगळे प्रश्न सोडवायचेत पण मार्ग पुसट होत चाललेत. मी अडकलोय आणि सुटायच कस माहिती नाही. फक्त एक मार्ग दाखवा.
Comments