Skip to main content

Posts

निसर्गचित्र : 2

निसर्गचित्र : १   पासून पुढे... "का रे? तोंड एवढ लालबुंद कशान झाल?", आई ने झटक्यात माझ्या चेहऱ्यावर दिसणारा फरक ओळखला! "माझा फेसवॉश परत वापरलास काय? ॲलर्जी आहे आपल्याला माहितीये ना तरी पण? " आई ला कस सांगायच आता मी नक्की तोंड कुठून लाल करून आलो ते! आई ने परत माझ्याकड डोळे वटारून बघितल आणि मी तोंड खाली घालून पोहे खायला लागलो. डोक्यात चालूच होत ते सकाळी बाथरूम मध्ये घडलेल. "आज शाळेत जायच्या आधी परत एकदा बाथरूम मध्ये जाऊन बघायलाच पाहिजे काय होत ते", मी स्वतःशीच म्हणालो. "काय?", आईने बहुतेक ऐकल मी म्हणलेल पण तरी काही नाही अस सांगत मी मान हालवली! कधी कधी आईसमोर सुद्धा आपण कशालाही घाबरत नाही अस दाखवायची हुक्की येते आणि म्हणूनच मी तीला त्या घटनेबद्दल काहीच बोललो नाही. पोहे कसेतरी संपवले आणि झटक्यात बाथरूम मध्ये पळालो. आवाज यायची वाट बघायला लागलो, ५ मिनिटे झाली, १० झाली पण आवाज येईना. मग लक्षात आल की सकाळी पाणी सोडलेल बादलीत! नळ चालू केला आणि बादलीकडे पाठ करून आरशात बघत उभा राहीलो . एक मन म्हणत होते की खरच कोणीतरी बोलले सकाळी तर दुसरे मन म्ह...

निसर्गचित्र : १

"अरे उठ की आता, १० वाजले", आई अगदी किंचाळून उठवत होती मला! आणि मग शेवटचा उपाय म्हणून तीने टेबल वरचा तांब्या उचलला आणि माझ्या तोंडावर रिकामा करून मोकळी झाली! "आई!", अगदी झोपायच्या आधी किंवा उठल्या नंतर मला किती पण त्रास द्या फक्त झोपेतून उठवायच नाही, नायतर मग माझ डोक सटकतच! "सुट्टीच चालू आहे की आई कशाला उठवलस", मी कितीही तक्रार करू देत पण आमची आई त्याला एकाच प्रकारे उत्तर देते 'गप्प बसून' कारण तीला माहीती आहेच शब्दाला शब्द वाढला आणि बाबांना बोलवायची गरज पडली तर किती प्रकारच्या शिव्या पडतात मला ते! आई च्या खास आग्रहास्तव मी पण मग उठून, आवरून, आंघोळीला गेलो! बाथटब वगेरे असल्या फाजील लाडांना आमच्या घरी जागा नाही, गॅस गीझर चालू केला आणि बादलीत पाणी सोडल आणि बादली भरायची वाट बघू लागलो! बादलीत पडणाऱ्या पाण्याचा आवाज जस जस पाणी वाढत होत तसा तसा कमी होत होता, तोपर्यंत काय टाईमपास करायचा आणि किती वेळ बादलीकडे बघत बसायच म्हणून मी शेजारच्या आरश्यात बघून दाढी कुरवाळत बसलो. तेवढ्यात मागून आवाज आला,    "शूऽऽशूऽऽक  शूऽऽशूऽऽक" मागे वळून बघित...

नीरज्या

मैत्री व्हायला फार काही लागत नाही फक्त एकदा भेट होण महत्वाच असत. मैत्री कामातून होते, वर्गातल्या एकाच बाकावर होते, दुपारच्या सुट्टीत खाल्लेल्या डब्यामुळे होते, ती अनपेक्षित असते म्हणून खुलते. मला आठवतय college सूरू झाल्यापासून पहिलच practical होत FEC ह्या विषयाच एका मित्राला विचारून मी एका building खाली उभा होतो, त्याच building मध्ये त्या विषयाची lab होती. तेवढ्यात तिथे वर्गातलाच पण एक अनोळखी मुलगा दिसला, माझ्याकडे पाहून हसला मग मीही त्याच्याशी बोलायला गेलो. त्याने विचारले, "डबा खाल्लास का?" अरे हो मी तर डबा खायचाच राहिलेलो; "चल खाउया", अस म्हणून तो मला ground वर घेऊनच गेला. त्याच्या सांगलीच्या मित्रांच्यासोबत डबा खायला. डबा खाऊन झाल्यावर confirm करण्यासाठी परत lab चा पत्ता विचारला आणि खरच ही त्याची आणि माझी पहिलीच भेट होती, तो मला lab पर्यंत सोडायला आला. तेव्हापासून आत्ता अगदी ५ मिनिटांपुर्वी पर्यंत आम्ही कायम सोबत असतो. college मध्ये तर काहीही काम असुदे आम्ही एकत्रच असायचो. FE मध्ये वर्गात झालेला पहिला मित्र म्हणजे नीरज. नीरज दाते, हुशार, खेळाडू वृत्तीचा आणि आप...

"जीम जॅम जेमी बूम"

"जीम जॅम जेमी बूम" काय आठवल का? शाळा सुटल्यावर पळत पळत घरी जाऊन हात पाय धुतल्यावर आईने दिलेला तो पोह्याचा चिवडा खात T.V. लाऊन बसायचो! आणि दुनियेला वाचवण्यासाठी यायचा Junior G . त्याच्या त्या निळ्या outfit च्या प्रेमात बहुतेक आपण सगळेच पडलो असू! रविवारी थोड उशीरा उठून आई चा ओरडा खाल्यावर दिवसभर पाठीला शाल किंवा towel गुंडाळून घरभर पळायचो आणि स्वतःलाच Junior G असल्या सारख समजायचो. दुपारी लागायच ते शक्तीमान आणि संध्याकाळी Junior G, आधे मधे मालगुडी डेज च वेगळच अप्रूप असायच. तसे option फार नव्हते, आमच्याकडे तरी खूप वर्षे दूरदर्शनच लागायच. परत परत tv च्या antenna ला थटून दुसर्याची cable जायला लागली तेव्हा कुठे star plus, sahara tv, cartoon network असे अवली चॅनेल्स दिसायला चालू झाले तरी पण शक्तीमान ची वेळ शेवट पर्यंत चुकली नाही. संध्याकाळच्या Junior G ची सांगता झाल्यावर त्याची जागा Sahara वरच्या सिंबा ने घेतली आणि त्याच्यानंतर ची ती सिंडरेला! Jungle Book तेव्हा पुन्हा Sahara tv वर चालू झालेल आणि आम्ही पोर त्या मोगली च्या दुनियेत हरवून बसलेलो. उंदराच्या माग पळणाऱ्या मांजराची चटक प...

मी एकदा पावसात

दुकानात फक्त Parle-G चा पुडा आणायला गेलेलो, आणि पावसाने अचानक जोर धरला. भिजत जाव की नको असा विचार मनात आला पण म्हणल की कधी एवढ पळत जायच! जरा कमी आला की जाऊया म्हणून तिथेच थांबलो. जवळच मुलींची शाळा असल्यामूळे दुकानात गिर्ह्राईकांच्या ऐवजी मुलींचीच गर्दी अधिक. बघितल तर ८-९वी तल्या मुली असाव्यात, एकीने दप्तरामधून एक मोठा मोबाइल बाहेर काढला तो मोबाईल बघून चाटच पडलो. एवढा ग्रज्युएट झालोय पण अजून एवढा भारीतला मोबाईल घ्यायच धाडस होत नाही माझ आणि ही मुलगी अगदी हसत खेळत मोबाईल वापरत होती. तेवढ्यात तीला कोणाचातरी call आला, "हो अरे भिजत नाहीये मी, दुकानात थांबले एका!" तिकडून कोणितरी तीला भिजू नको अस सांगत होत. मला वाटल भाऊ, वडील वगेरे वगैरे कोणितरी असेल. " नको दादा येणार आहे न्यायला, तु नको येऊ " (तिकडून येण्याबद्दल काहितरी बोलण झाल असाव) ही काहीतरी वेगळीच भानगड दिसते अस म्हणून मी त्या बोलण्याकडे सपशेल दुर्लक्ष करायला चालू केल! एखाद्याच्या personal गोष्टींशी आपल्याला काय करायच आहे. बाहेर पावसाचा तडाखा वाढतच होता, आणि मला शेजारी उभारलेल्या त्या मुलीच्या फोन वरच्या बोलण्याने अ...

The 100 Rupee Investment : Efforts

If there is a plan to do something then that thing must be successful. And if you're getting failed in it then there must be some or another way to do it. Every successful entrepreneur, businessman has one thing in common. One thing that made Bill Gates to sell his 'windows' to nearly every computer user in world, that thing made 'Facebook' a large success. The same thing made JRD Tata to form Tata industries, also helped J K rolling to sell her books and become 'the richest writer in world'. You wonder what is that thing? That thing is, 'hardwork'. You don't have your faith in your hand, not your destiny and even you can't adjust circumstances around you but what you can do control is your action. Even if you are not enriched with so much skills but you can work hard to make your efforts pay for you. People always put you in the corner and see you in wrong way but to prove them wrong you must do work hard on your plan. I know, sayin...

The 100 Rupee Investment : Start-up

     'My Business', I used to tell everyone. Whenever they asked me about my future my answer remained same all thses years. I have always dreamed about my own empire. Not only because it gives money but also more importantly it gives 'power'. I know it is definitely a thing to laugh. A middle class boy, average in studies, not much backed with money but dream to be an entrepreneur.        People do laugh when they think you can't do things. And I have heard somewhere that, "Things which people think you can't do       are the things you must do"  This damn sentence always inspire me and helps me to neglect those who laugh at my back. People themselves can't do some things and they declare those as impossible. They fail in perticular task and they wish that everyone should fail in it as they did. Those people are not necessarily your enemies, they can be your friends, your best friends! But now if you start thinking wr...

Social Media