एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि
त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार
करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ??
एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध
नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी
सुविधा, संरक्षण,
आर्थिक बाबी पुरवत, आणि सरकारच कामच आहे ते...
पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो.
आपण पैसा कमावतो, मोठा बंगला बांधतो, गाड्या
फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं
म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार
आणि विचार.
मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा
विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते, ते सगळे देश इथे आले असते करार
करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद
हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा
नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा
जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा युरोपला जावा लागणार नाही.
आपल्या शास्त्रज्ञांना फक्त पैशासाठी बाहेरच्या कंपनीत नोकरी करावी लागणार नाही.
कदाचित ह्या मुळे आपल्या देशातही Microsoft सारखी एखादी मोठी कंपनी तयार होईल. पण पुढच्या
पिढीला हे सगळा द्यायचं असेल तर आपण आत्तापासूनच सतर्क होऊन फक्त आणि फक्त आपल्या
देशासाठी जगल पाहिजे.
या सगळ्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या
आयुष्यात काहीच स्वतःसाठी करू नका, स्वतःसाठी तर करायच पण जे काही कराल ते असा करा की
देशहित सुद्धा त्यात असाव.
पण काय हे बोलतोय मी, आपले नागरिक ते करत नाहीत,
त्यांना शाहरुखला शिव्या द्यायच्यात, संजय
लीला भंसाली ची फिल्म बंद पडायची आहे... त्यांच्यासाठी तेच महत्वाचे आहे.
अहो शाहरुख ने माती खाल्ली असेलही पण त्याला
विरोध करत आपला वेळ घालवणे खरच मूर्ख पणाचे नाही का?
आज रेडिओ वरती कादंबरी वाचनाचा कार्यक्रम ऐकला, वाचन अगदी उत्तम होत, वाचकाच खरच कौतुक.
ती कादंबरी होती टिळकांच्या जीवनावरती, त्यातला एक प्रसंग मला
मुद्दामून सांगावासा वाटतोय,
टिळक आणि आगरकर रात्रीच्या निरव शांततेत
सादिलबुवा च्या टेकडीवर जातात आणि तिथल्या आल्हाददायक वातावरणामुळे आगरकर खरच
भारावून जातात.
ते टिळकांना त्वर्तेत म्हणतात, “ किती सुंदर दृश्य असेल ते
बळवंतराव, विचार करा. आपला भारत स्वतंत्र झालाय, चहूबाजूला
फक्त आनंद आणि उत्साह दिसतोय प्रत्येक तरूण आपापल्या व्यवसाय, नोकरी मध्ये व्यस्त
आहेत. कोणीतरी न्यूटन, एडिसन त्यांच्या प्रशस्त प्रयोगशाळेत
प्रयोग करतायत. उद्योगधंदे हे प्रगतीच्या उच्चतम पातळीपर्यंत पोहोचलेत, आपल्यासारखेच कोणीतरी त्याच्या जहाजातून समुद्र सफारीला निघालाय, तक्षशिला विद्यापीठ पुन्हा सुरू झालेलं आहे आणि तिथे जगातल्या बहुतांश
देशातले लोक अभ्यास करायला येतायत खरच एक विहंगम दृश माझ्या डोळ्यासमोर येत आहे”
*खरच अस दृश्य आत्ता प्रत्येक तरुणाच्या
डोळ्यासमोर आले तर आपला देश खरच लवकरच महासत्ता होईल.*
त्या सर्व तरुणांना आपल्या देशाच हित पटवून
त्यांच्याकडून देश हिताची कामं करून घेण्यासाठी सावरकरांच एक वाक्य कायम लक्षात
ठेवण्यासारख आहे,
“
देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो
आणि त्या देशाचे आपण देणे लागतो.”
Comments