आज मी एक स्वप्न उराशी बाळगून आहे आणि निश्च्तीतच मी ते पूर्ण करणार. पण आयुष्यात खूप घटना अश्या घडतात की आपल्याला आपल्या निर्णयांना, आपल्या स्वप्नाना मुरड घालावी लागते आणि आपण ती घालतो. पण कधीतरी आयुष्यात मला माझ्या खर्या स्वप्नाचा विसर पडला तर हा लेख मला नक्कीच माझ्या स्वप्नांची पुनःश्च एकदा आठवण करून देईल.
आज तो क्षण आलाच...! प्रत्येक अभियंत्याच्या आयुष्याची गाथा ठरवणारा किंबहुना त्याचे पुढचे आयुष्य ठरवणारा, तो दिवस.
गेली ४ वर्ष कसून तयारी करून स्वतःची जाहिरात करण्याचा दिवस.
मी दरवाज्यावर knock केल आणि आत गेलो, जाताना ‘may I come in ?’ अस विचारायला अजिबात विसरलो नाही. आत जाऊन मला विकत घ्यायला आलेल्या एका इसामासमोर जाऊन मी उभा राहिलो. त्याने मी न विचारताच बसण्याची खूण केली, मीही पटकन बसलो. मग चालू झाला प्रश्नांचा मार. पहिलाच प्रश्न आला, ‘ओळखीचा’ होता. त्याने विचारल “Tell me something about yourself?”. गेली ४ वर्ष ज्या प्रश्नाच उत्तर रोज देत होतो तोच प्रश्न आज त्यान विचारलेला पहिलाच प्रश्न होता. मी पण जोमात सांगायला सुरुवात केली, “ I am Shardul Narendra Mandrupkar, my hometown is Islampur. I have completed my B.E. electrical degree from ADCET,ASHTA, etc etc……” असाच काहीतरी बडबडून मी गप झालो. पण त्याला अजून काहीतरी अपेक्षित होता. त्याने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाला, “Tell me something that is not included on your resume.”
आता आली का पंचाईत, अगदी तोंड पाठ केलेला निबंध त्या माणसाला बोलून दाखवला जणू माझी लहानपणापासूनची कुंडली त्याला सांगितली आणि तो म्हणतो कि अजून काहीतरी सांग. त्यांनी अजून काहीतरी विचारलाय म्हणजे नक्कीच माझ्यात अजून काहीतरी खास शोधायचं असणार त्याना, पण तेच काय आहे हे माझ मलाच कळेनास झाल. मग चालू झाला शब्दांचा शोध.
थोडी सर्वनाम, कर्ते, कर्म आणि क्रियापदे शोधून वाक्य तयार केल आणि अशीच काहीतरी वाक्य तयार करून त्याला बोलून दाखवली. पण मी नक्की काय बोललो ते कळलच नाही... त्याला तरी कळाल का हेही समजल नाही. भाषण संपल मग आता पुढे काय? बोलायचं काय? मनातल्या मनात माझाच स्वतःचा शोध सुरु झाला आणि माझीच स्वप्न मला उलगडत गेली.
पहिल्या वर्षात प्रवेश करताना जी स्वप्न आंजारून गोंजारून सांभाळली त्या स्वप्नांचा चौथ्या वर्षात येईपर्यंत चक्काचूर झाला. उद्योजक होण्याची स्वप्न बघणारा मी आता IT corporate च्या जाळ्यात अडकायला चालला. हे सगळे विचार मनात एकाएकी येऊन गेले आणि मी निःशब्द झालो. समोरच्या interview घेणार्याला सुद्धा हे लक्षात आल असाव. तो हसला आणि त्याने मला बाहेर जायला सांगितल.
त्या दिवशी संध्याकाळी एकटाच फिरायला बाहेर पडलो मैदानातल्या बेंच वर एकटाच जाऊन बसलो आणि स्वतःशीच बोलायला लागलो. बर झाल चूक लक्षात आली कारण त्या जाळ्यात मी अडकलो असतो तर कदाचित म्हातारपणी माझ्या या निर्णयावर पश्चाताप करत बसलो असतो.
मी माझी स्वप्नच नोकरीच्या दडपणापोटी चिरडायला निघालो होतो.
स्वतः चा शोध मला आज नव्याने लागला. मी कदाचित चांगला interview देऊन मोठ्या पगाराची नोकरी मिळवलीदेखील असती पण समाधान फक्त स्वप्न पूर्तीनेच मिळत.
Comments