लेखक जे काही लिहतो त्याच नवल तो सोडून इतर सगळ्यांना वाटत असत ... खर सांगू का? लेखकाला त्याच काहीच अप्रूप वाटत नसत. त्याच्यासाठी ते एखाद्या मराठीच्या पेपर मधल्या क्षुल्लक निबंधासारख असत ते. त्यामुळे जस परीक्षेत आपल्याला कळत नाही की निबंध काय लिहिला जातोय तसा लेखकाला सुद्धा काळात नसत की तो जे लिहितोय ते खरच इतर लोक वाचतील का? त्याच काम लिहीण आहे आणि आपल्यासारख्यांच काम ते वाचणं हे आहे. मघाशीच पु.ल. देशपांडेंच एक वाक्य वाचनात आल... कदाचित त्याच शीर्षक फसवणूक आणि हसवणूक अस होता पण वाक्याचा अर्थ समजून घेण खूप म्हत्वाच आहे असा मला वाटत. पु.ल. असा लिहितात, “जन्म आणि मृत्यू ह्या दोन टोकांमध्ये पकडून नियतिने चालवलेली आपणा सगळ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणार्या माणसांची ‘हसवणूक’ करण्यापलीकडे आणखी काय करायचं?” खरच बघा त्यानी त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा अर्थ ह्यात स्पष्ट केलाय अगदी. त्यांनी आयुष्यभर आपल्याला हसवलं आणि अजूनही त्यांची पुस्तकं, कथा आपल्याला अजून हसवतायत. त्यानी आयुष्याची गाडी वेगळ्या पद्धतीने चालवली आणि ते यशस्वी झाले. जन्म ते मृत्यू ...