आजही मी तुला माझ्या मनातच पाहतो...
तुझ्यासाठी कधी मी अश्रूही वाहतो...
तुझ्याशी माझ्या मी मनातच बोलतो...
दिवसाही, रात्रीही तुझ्यातच राहतो...
मनातले तुझ्या भाव ऐकण्या,
मी कायम आतुर असतो...
"कळी फूल होते, पण थोडा वेळ घेते,
फुलं पण सुगंध देतात, पण त्याच्याजवळ जावे लागते,
मनही तसेच असते,
थोडा वेळ घेते,
विचार करते,
आणि निर्णय घेते..."
पण तुझ्या नजरेने हा विचारही फेल ठरतो,
तुला समोर पाहता माझा विचारच थांबतो..
तुझ्या जवळ जाऊन, तुझा श्वास व्हावं,
या विचारात,
मीच हरवतो...
कुणासाठी कधी वेळ थांबला नाही...पण...
तुझ्यासाठी आज कालही थांबावासा वाटतो...
*
पण....!
मनाला माझ्या आज मी थांब म्हणावे,
जसे की तुझे गणित सोडून द्यावे,
काहूर तुझे विरघळून जावे...
मी माझ्या मनाला आता हेच समजावतो...!
फक्त समजावतो...!
Comments