चतुर्थी म्हणाल की डोळ्यापुढे उभे राहतात ते म्हणजे बाप्पा ।। गणपती बाप्पा. अनादी काळापासून पृथ्वीवर फक्त आपल्या भक्तांसाठी दरवर्षी येतात ते गणपती बाप्पा. असही म्हणतात की आपल्या गरीब भक्तांसाठी बाप्पा तर बाजारात सुद्धा विकले जातात पण त्या गरिबाला मदत करतात.
5 दिवस घरात तर 10 दिवस मंडळात साजरा केलेला गणपती, सगळ्यांच्याच घरात ला सदस्यच असतो. तो येतो तो खर तर पाहुणा म्हणून पण आल्यावर अस वाटत की जणूकाही आपल्या घरातलाच एक आहे. त्याला मोदक आवडतात म्हणून मोदक तर सगळीकडेच होतात पण महाप्रसादही सगळीकडेच होतो. ह्या सगळ्या पदार्थांच्यातून वेळ मिळालाच तर त्याची आरती होते आणि पूजा देखील होते. मंडळ सगळीकडे होतात आणि मूर्त्याही आकर्षक होतात. पण भाव थोडे कमीच वाटतात, हाव दिसते डोळ्यात आणि फक्त लोभ जाणवतो वागण्यात. आरती देखील हल्ली बोली लावून जिंकली जाते मग कुठून येणार सदभाव आणि नीती!? कदाचित हे प्रश्न बाप्पा ला पण पडत असतील का!!?! माहीत नाही पण मला तरी पडलेत.
नमस्कार तर सगळेच करतात , अगदी साष्टांग दंडवत घालतात पण देवाने आपल्याला काहितरी द्यावं ह्या हाव्यासापोटी. ! २१ वेळा अथर्वशीर्षाची आवर्तन होतात पण उच्चारही ऐकू येत नाहीत.
रोज त्याला स्वतः साठी तर मागतोयच पण मग एक दिवस ह्या माग पडलेल्या समाजासाठी काहीतरी मागा! दुष्काळ हटवण्यासाठी पावसाची मागणी करा, त्या दुर्लभ आणि दुर्लक्षित लोकांसाठी काहीतरी मागा! गणपती ला lighting तर सगळेच करतात पण मनातला निर्मळ भाव का कमी पडतो...?
ह्या गणेशोत्सवाला चला ह्या समाजाला जाग करूया! त्यांना पण हा प्रश्न पडायला हवा, "बाप्पा दरवर्षी ह्या साठी आपल्याकडे येतो का!??"

Comments