निसर्गचित्र : १ पासून पुढे... "का रे? तोंड एवढ लालबुंद कशान झाल?", आई ने झटक्यात माझ्या चेहऱ्यावर दिसणारा फरक ओळखला! "माझा फेसवॉश परत वापरलास काय? ॲलर्जी आहे आपल्याला माहितीये ना तरी पण? " आई ला कस सांगायच आता मी नक्की तोंड कुठून लाल करून आलो ते! आई ने परत माझ्याकड डोळे वटारून बघितल आणि मी तोंड खाली घालून पोहे खायला लागलो. डोक्यात चालूच होत ते सकाळी बाथरूम मध्ये घडलेल. "आज शाळेत जायच्या आधी परत एकदा बाथरूम मध्ये जाऊन बघायलाच पाहिजे काय होत ते", मी स्वतःशीच म्हणालो. "काय?", आईने बहुतेक ऐकल मी म्हणलेल पण तरी काही नाही अस सांगत मी मान हालवली! कधी कधी आईसमोर सुद्धा आपण कशालाही घाबरत नाही अस दाखवायची हुक्की येते आणि म्हणूनच मी तीला त्या घटनेबद्दल काहीच बोललो नाही. पोहे कसेतरी संपवले आणि झटक्यात बाथरूम मध्ये पळालो. आवाज यायची वाट बघायला लागलो, ५ मिनिटे झाली, १० झाली पण आवाज येईना. मग लक्षात आल की सकाळी पाणी सोडलेल बादलीत! नळ चालू केला आणि बादलीकडे पाठ करून आरशात बघत उभा राहीलो . एक मन म्हणत होते की खरच कोणीतरी बोलले सकाळी तर दुसरे मन म्ह...