Skip to main content

"जीम जॅम जेमी बूम"

"जीम जॅम जेमी बूम"
काय आठवल का?
शाळा सुटल्यावर पळत पळत घरी जाऊन हात पाय धुतल्यावर आईने दिलेला तो पोह्याचा चिवडा खात T.V. लाऊन बसायचो! आणि दुनियेला वाचवण्यासाठी यायचा Junior G . त्याच्या त्या निळ्या outfit च्या प्रेमात बहुतेक आपण सगळेच पडलो असू! रविवारी थोड उशीरा उठून आई चा ओरडा खाल्यावर दिवसभर पाठीला शाल किंवा towel गुंडाळून घरभर पळायचो आणि स्वतःलाच Junior G असल्या सारख समजायचो. दुपारी लागायच ते शक्तीमान आणि संध्याकाळी Junior G, आधे मधे मालगुडी डेज च वेगळच अप्रूप असायच. तसे option फार नव्हते, आमच्याकडे तरी खूप वर्षे दूरदर्शनच लागायच. परत परत tv च्या antenna ला थटून दुसर्याची cable जायला लागली तेव्हा कुठे star plus, sahara tv, cartoon network असे अवली चॅनेल्स दिसायला चालू झाले तरी पण शक्तीमान ची वेळ शेवट पर्यंत चुकली नाही. संध्याकाळच्या Junior G ची सांगता झाल्यावर त्याची जागा Sahara वरच्या सिंबा ने घेतली आणि त्याच्यानंतर ची ती सिंडरेला! Jungle Book तेव्हा पुन्हा Sahara tv वर चालू झालेल आणि आम्ही पोर त्या मोगली च्या दुनियेत हरवून बसलेलो. उंदराच्या माग पळणाऱ्या मांजराची चटक पण तेव्हाच आम्हाला लागली! (ती अजून पर्यंत आहे)
 गंगाधर आणि शक्तीमान मधला फरक हळू हळू जाणवू लागला तसा ह्या कार्यक्रमांचा जिव्हाळा वाढू लागला. आमच्या भोळ्या बालमनाला ह्याच superheros नी भुरळ पाडली त्यामूळे पुढे देखील खूप वर्ष आमच्यासाठी नवीन आलेल्या ह्या spiderman आणि superman साठी आमच्या हृदयात जागाच नव्हती. विदेशी hero च खूळ लागल ते पण हॅरी पॉटर मुळे पण ते देखील तेवढ्यावरच मर्यादीत. cartoon network वरती लागणाऱ्या pokemon ने तर नंतर प्रेमातच पाडल.!
आजही जेव्हा कुठे " शक्तीमान... शक्तीमान..." अशी धून ऐकू येते तेव्हा कान टवकारले जातात, मन आठवणींच्या जगात उगाचच हरवून जात आणि त्या काळाच्या हट्टासाठी डोळ्यात पाणी देखील तरारत. हल्ली youtube वरती खूप काही परत अनुभवायला मिळत पण शेवटी त्या वयाची आणि त्या काळाची मजाच काही और आहे. आता कीती जरी repeat telecast केले तरी सचिन-सेहवाग ला live खेळताना बघण्याच सुख हल्लीच्या T-20 जगाला नाही कळणार. त्यावेळी घरी black'n white TV असायचा पण जगण्याला मजा होती, तो चालू करण्यासाठी भांडण व्हायची. आता घरी ६०-७० इंची TV आलेत पण बघायला बसाव असे कार्यक्रमच लागत नाहीत. क्रिश बघताना कोइ मिल गया ची feeling येत नाही. दिवस बदलतात हे खर आहे पण काही गोष्टी ह्या जुन्याच छान वाटतात. त्या सगळ्यांनीही आपल्यावर प्रेम केल असेल कदाचित जेवढ आपण त्यांच्यावर केल!
कदाचित अजूनही ओढ त्या ९० च्या दशकातलीच असेल!!

Comments

Anonymous said…
You put smile on my face while reading😊too good👍
Thank you! My pleasure 😊
#anonymous

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

माणूस ओळखायचं गणित

 काहीतरी चुकतंय. माणूस ओळखायला? की माणूस जाणून घ्यायला? कुठेतरी काहीतरी हरवतेय,  मनाच्या कोपऱ्यात शंकांचं काहूर माजतय आणि सैरभैर होऊन चित्त थळ्यावरून हल्लय. काहीच सुचत नाही, कोण कसे आणि कोण कसे... नक्की ओळखायचं तरी कसं? पारखायच कसं की भेटणारा रोज बोलणारा आपला म्हणायचा तो माणूस आपलाच का? काहीतरी वेगळं पाहिजे ना? वेगळी नीती, वेगळी पद्धत? माणसं ओळखायची?? एक टूलकिट वगैरे सारखं म्हणजे कसं माणसं ओळखता येतील. कोणीतरी पुढे येऊन ये करायला पाहिजे, एक पद्धत बनवून सगळ्यांचच कल्याण केलं पाहिजे. कधी कधी कोड च पडत की हा समोर बसलेला माणूस जो आपल्याशी प्रेमाने बोलतोय, आपल्या जवळ येतोय तो नक्की मनातून आपलाच विचार करतोय का? आपल्याच भल्याचा विचार करतोय की फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतोय? कुठून येतं ते तंत्र जिथे माणसं ओळखायची कला अवगत होती? "बघितल्या बघितल्या मी ओळखलं होत, हा किंवा ही कशी आहे ते" हे बघितल्या बघितल्या ओळखायचं skill येतं कुठून? आणि कसं शिकायचं?  मला पण शिकायचंय, माणसं ओळखायला आणि जश्यास तस वागायला, परिस्थिती बघून पलटी मारणाऱ्या आणि नको तेव्हा इगो मोठा करून फुगून बसणाऱ्या, आ...

लिहितात नक्की कसं?

 काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं. एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत. खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं? कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल? म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही. हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे. आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो ...

Social Media