Skip to main content

निसर्गचित्र : 2


निसर्गचित्र : १   पासून पुढे...

"का रे? तोंड एवढ लालबुंद कशान झाल?", आई ने झटक्यात माझ्या चेहऱ्यावर दिसणारा फरक ओळखला!
"माझा फेसवॉश परत वापरलास काय? ॲलर्जी आहे आपल्याला माहितीये ना तरी पण? "
आई ला कस सांगायच आता मी नक्की तोंड कुठून लाल करून आलो ते! आई ने परत माझ्याकड डोळे वटारून बघितल आणि मी तोंड खाली घालून पोहे खायला लागलो. डोक्यात चालूच होत ते सकाळी बाथरूम मध्ये घडलेल. "आज शाळेत जायच्या आधी परत एकदा बाथरूम मध्ये जाऊन बघायलाच पाहिजे काय होत ते", मी स्वतःशीच म्हणालो. "काय?", आईने बहुतेक ऐकल मी म्हणलेल पण तरी काही नाही अस सांगत मी मान हालवली! कधी कधी आईसमोर सुद्धा आपण कशालाही घाबरत नाही अस दाखवायची हुक्की येते आणि म्हणूनच मी तीला त्या घटनेबद्दल काहीच बोललो नाही.
पोहे कसेतरी संपवले आणि झटक्यात बाथरूम मध्ये पळालो. आवाज यायची वाट बघायला लागलो, ५ मिनिटे झाली, १० झाली पण आवाज येईना. मग लक्षात आल की सकाळी पाणी सोडलेल बादलीत! नळ चालू केला आणि बादलीकडे पाठ करून आरशात बघत उभा राहीलो.
एक मन म्हणत होते की खरच कोणीतरी बोलले सकाळी तर दुसरे मन म्हणत होते की सकाळी सकाळी झोपेत गेला होतास आंघोळीला. एक दृष्टीने ते खर पण असेल की मी खरच आंघोळीला गेलो होतो तेव्हा झोपेत असेन, माणूस कधी कधी रात्री पडलेल्या स्वप्नात एवढा हरवून जातो की जाग आली, डोळे उघडले तरी स्वप्न दिसत राहत. कदाचित माझही तसच काहीस झाल असेल. पण एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे? एकदा बघुय तरी आवाज येतो का ते! म्हणून परत बादलीत पडणाऱ्या पाण्याच्या आवाजकडे कान टवकारून लक्ष द्यायला लागलो.
बादली भरली तिकडे आणि वाहायला लागली पण आवाज काय येत नव्हता. एवढ्यात आई ला कुठून काय माहित पाण्याचा आवाज आला आणि ती मला मारायच्या पवित्र्यात दार ढकलून आत आली. "अरे मुर्खा काय करतोयस, तिकडे माणसांना प्यायला पाणी मिळत नाही आणि तू बादली भरून वाया घालव" आईच्या पाणी वाचवा ह्या योजनेचा हा ठरलेला डायलॉग. आई अजून काही बोलायच्या आत मी सटकलो आणि बॅग उचलून थेट शाळेकडे निघालो. रस्ता तसा नेहमीचाच पण का काय माहीत आज थोडा वेगळा वाटत होता, रोज ह्याच वेळेत शाळेत जाताना जी मंडळी दिसायची तीच सगळी होती. कुलकर्ण्याच्या घडयाळाच्या दुकानाचे शटर अर्धवट उघडे होते आणि काका बाहेर सडा मारत होते. चौकातल्या सगळ्या सिंध्यानी दुकान उघडून देव पुजेला सुरुवात केली होती ( देव म्हणजे धन ) पोस्टाजवळच्या च्या खुप जून्या कौलारू दुकानात चश्मेवाले आजोबा पेपर डोळ्याला लावून वाचत होते. शेजारून रोजच भरदाव वेगात सायकल चालवत कट मारून जाणारी रम्या आणि शाम्या ही जोडगोळी पण दिसली. पण तरी आज काहीतरी वेगळ वाटत होत. आज सकाळी जे झाल त्यामुळेअसेल कदाचित म्हणून मी शाळेकडे कूच करायला लागलो.
सोमवारी शाळेत जायच म्हणजे खरच जीवावर येत, शनिवार आणि रविवारची सुट्टी खाल्ल्यावर सोमवारी पण शाळेला एखादी सुट्टी मिळावी अस प्रत्येकाला वाटत असत पण असे प्रसंग खूपच क्वचित येतात. तरीही आज मला शाळेत जावस वाटत होत कारण आज माझ्या आवडत्या विषयाची परिक्षा होती. (चित्रकला) लहानपणापासूनच चित्रकला म्हणल की माझ्या अंगात अस वार संचारत अस बाबा म्हणतात. आज त्याची चाचणी परिक्षा होती आणि म्हणूनच रंगरंगोटी च सामान सोडून बॅगेत मी दुसर काहीच आणल नव्हत. शाळेत पोचलो, वर्गात जाऊन बसलो आणि कधी नव्हे ते लगेच शाळेची बेल पण झाली. आमच्या शाळेत २ बेल असायच्या, एक warning साठी आणि नंतरची एक प्रार्थनेसाठी आणि ह्यावर्षी मी पहिल्यांदा दुसर्या बेल च्या आधी शाळेत हजर आहे. ( मनातल्या मनात उगाचच स्वतःचा अभिमान वाटू लागला) असो, बेल वाजली आणि प्रार्थना चालू झाली, " खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे..." माझी सगळ्यात आवडती प्रार्थना. 
प्रार्थना झाल्यानंतर आपापल्या वर्गाकडे पळत जायला लागले आणि त्या गर्दीत मीही धावपळ करायला लागलो.
अखेर परिक्षा चालू झाली, "तुम्हाला पाहिजे ते, मनात येइल ते चित्र काढा", आमचे काळे सर कधी नव्हे ते चांगल काहीतरी बोलले. 
कागद बेंच वर मावत नाही म्हणून तेलकट खडू आणि स्केचपेन सोबत घेऊन कागद जमिनीवर पसरवून खाली बसलो आणि विचार चालू झाला आज काय काढायच!
"एकच तास आहे तुमच्याकड लवकर चालू करा काढायला!", काळे सर बहुतेक माझ्याकडे बघूनच म्हणाले असावेत. 
" निसर्गचित्र ! हा तेच काढूया, सगळ्यात सोप्पं! ", रम्या शेजारीच बसलेला त्याला हळूच म्हणालो, आणि काढायला चालू केल.
आधी पेंसिल ला टोक केली, घाण सगळी खालीच पडली आणि मग सर लांब आहेत ते बघून तशीच दप्तरात सारली! (आमच्या वर्गात अशी घाण केली तर २ दिवस लवकर येउन वर्ग झाडावा लागतो) डोंगर काढायला चालू केले, एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे नागमोडी वळणे घेत डोंगर रेखाटून झाले. आता नदी एक दाखवावी का एखाद घर काढाव अश्या संभ्रमात पडलो आणि कुठूनतरी आवाज आला..
"शूऽऽक शूऽऽक !!"
एकदम चमकून अलिकडे पलिकडे बघितल पण सगळे चित्र काढण्यात रमून गेलेले कोणाचच लक्ष नव्हत. 
"सकाळी जस झाल तसच झाल असेल का आत्ता??", आता खरच भिती वाटायला लागली होती. 
"पण सकाळी आवाज बादलीतून आलेला, आता बादली कुठे आहे इथे?", माझ स्वतःशीच बोलण चालू होत.!
"का रे ? तु तर आता कुठे बाथरूम मध्ये आहेस? मग मी तरी का फक्त बादलीतून भेटायच?", तो आवाज जरा मोठ्याने आणि स्पष्ट ऐकू आला. मी काढलेल्या चित्रातूनच तो येत होता. त्या चित्राकडे एकटक पाहू लागलो आणि अचानक अस वाटायला लागल की ते चित्र पूर्ण होतय, मी काढलेले डोंगर जरा खऱ्यासारखे दिसायला लागले, त्याच्यावर हिरवळ दिसू लागली, हळूच एका दरीतून  खळखळ करत नदी वाहू लागली! जस जस नदीच पाणी पुढ येत होत तस तस आसपास चा पांढरा कागद झाडांनी, फुलांनी बहरून जात होता. नदीमधून अधुन मधुन छोटे मोठे मासे तोंड वर काढत होते आणि झाडांसोबतच पक्षांची किलबिलसुद्धा ऐकू येत होती. नदीचा पाठलाग करत असतानाच कागद संपला, हिरमूसून थोड बाजूला बघितल तर तिथेच नदीच्या किनारी एक टुमदार बंगला दिसत होता.. बंगल्याच्या आजुबाजूला जाणून बुजून वाढवलेली बाग होती आणि बागेत एवढी फुले होती की तेवढी मी कधीच बघितली नव्हती. वेगवेगळ्या रंगांची आणि बहुतेक वासांची फुले सगळीकडे बहरली होती.
"अरे गधड्या!!!", धपकन पाठीवर एक गुद्दा बसला. "नुसत कागदाकडे बघत बसल की चित्र आपोआप होणार आहे का?", काळे सर रागाने अजून एखादा गुद्दा मारायच्या तयारीत असलेले दिसले आणि त्याना सोडून पुढे तो दिसणारा निसर्ग बघावा तर कागद मोकळाच दिसत होता. " मुर्खा ", अजून एक गुद्दा बसला तेव्हा कुठे भानावर आलो. "तु चित्रकलेत नापास होणार आहेस!", अस सर म्हणत असतानाच बेल वाजली आणि परिक्षेची वेळ संपली!!
(क्रमशः)


Comments

एक नंबर... आता लवकर पुढचा भाग लिहा नाहितर आमचा गुद्दा खावा लागेलं
Unknown said…
Waiting for next part
लवकरच पुढचा भाग येईल तुमच्या भेटीला!! काळजी नसावी!
गुद्दा खायची वेळ येणार नाही 😜😂
Unknown said…
We want next part!!!

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

माणूस ओळखायचं गणित

 काहीतरी चुकतंय. माणूस ओळखायला? की माणूस जाणून घ्यायला? कुठेतरी काहीतरी हरवतेय,  मनाच्या कोपऱ्यात शंकांचं काहूर माजतय आणि सैरभैर होऊन चित्त थळ्यावरून हल्लय. काहीच सुचत नाही, कोण कसे आणि कोण कसे... नक्की ओळखायचं तरी कसं? पारखायच कसं की भेटणारा रोज बोलणारा आपला म्हणायचा तो माणूस आपलाच का? काहीतरी वेगळं पाहिजे ना? वेगळी नीती, वेगळी पद्धत? माणसं ओळखायची?? एक टूलकिट वगैरे सारखं म्हणजे कसं माणसं ओळखता येतील. कोणीतरी पुढे येऊन ये करायला पाहिजे, एक पद्धत बनवून सगळ्यांचच कल्याण केलं पाहिजे. कधी कधी कोड च पडत की हा समोर बसलेला माणूस जो आपल्याशी प्रेमाने बोलतोय, आपल्या जवळ येतोय तो नक्की मनातून आपलाच विचार करतोय का? आपल्याच भल्याचा विचार करतोय की फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतोय? कुठून येतं ते तंत्र जिथे माणसं ओळखायची कला अवगत होती? "बघितल्या बघितल्या मी ओळखलं होत, हा किंवा ही कशी आहे ते" हे बघितल्या बघितल्या ओळखायचं skill येतं कुठून? आणि कसं शिकायचं?  मला पण शिकायचंय, माणसं ओळखायला आणि जश्यास तस वागायला, परिस्थिती बघून पलटी मारणाऱ्या आणि नको तेव्हा इगो मोठा करून फुगून बसणाऱ्या, आ...

लिहितात नक्की कसं?

 काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं. एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत. खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं? कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल? म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही. हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे. आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो ...

Social Media