Skip to main content

Quadratic Equation



काही नद्या सरोवरालाच जाऊन मिळतात, नियतीच तशी असते
मग गाळ साचत राहतो आणि बांध फुटत जातात,
डोंगर पाण्याखाली जातो, आणि
तिकडं समुद्र कोरडाच राहतो,
त्याची व्यथा, त्याचा आक्रोश, त्याची निराशा त्याची त्यालाच कळते.
(मनन©)


नुसतीच 4rth सेम संपली होती. सुट्टीत काही ताण नसतो, निवांत असायचो, मित्रां बरोबर वेळ मजेत चालला होता, आम्ही 5 मित्र मी(ओंकार), आकाश, शुभम, ऋषी आणि सुमित ...नेहमी एकत्रच ....आपलं ठरलं होत...सकाळी क्रिकेट खेळायचं, संध्याकाळ झाली कि बागेतल्या बाकड्यावर जाऊन पडायच...असं खास काही न्हवता तिथं ...कॉलनी च्या गेट मधून आत आलं कि डाव्या बाजूला होती..एका बाजूला लहान मुलांना खेळायला जागा होती घसरगुंडी, पाळणा आणि काय काय होत.....दुसऱ्या बाजूला बाकडी आणि त्या बाकड्यावर पाचवीला पुजलेले कॉलोनीतली म्हातारे-म्हातारी....तर तिथं आम्ही कायम पहुडलेलीच....

असच एका संध्याकाळी तिथं बसलो होतो ...तेवढ्यात गेट मधून रिक्षा आत आली, आत कोणी तरी अतिशय सुंदर युवती बसलेली होती...ती इतकी सुंदर होती कि थोड्या वेळासाठी मला तर.... ती रिक्षा नसून ...इंद्राच्या दरबारातून सुंदरी ला घेऊन रथ कॉलोनीत आला कि काय असा भास झाला ...पूर्ण नजरेपार जाई पर्यंत मी तिच्याकडेच बघत बसलेलो (बॅकग्राऊंड ला " अभि ना जाओ छोड कर, के दिल अभि भरा नही " हे गाणं वाजत होतंच) थोडक्यात काय तर तेलव्ह @ फर्स्ट साईट" ची भानगड झाली होती.

बुडणार्यान जिवाच्या आकांताने हात पाय हलवावेतअगदी तशीच हालचाल करून...तिची माहिती मिळवायला सुरुवात केली...नाव होत स्नेहल...पुढच्याच लाईन मध्ये घर पलीकडच्या पाटील काकूंची भाची होती. नुकतीच ऱ्या वर्षाला आली होती इंजिनीरिंगच्या. सुट्टी ला आली होती इकडं .आता ओळख तर करायची होती पण कशी हा मोठा प्रश्न.मित्राकडून ओळख करून घ्यावी तर समाजातल्या गोष्टींची पाल मनात चुकचुकली, ज्या बहाद्दराला ओळख करायला पाठवलाय तिला तोच आवडला म्हणजे काय करायचा??नको रे बाबा...शांततेनं काम घेऊ असा मनाशीच ठरवलं आणि योग्य वेळेची वाट पाहू लागलो आणि एक दिवशी संधी स्वतः चालून आली, पाटील काकू घरी आल्या होत्या. मी न्हवतो घरी पण घरी आल्यावर आई सांगितला कि, स्नेहल ला M3 अवघड वाटत होता (मला तर त्यातच जास्त मार्क्स होते). काकूंची इच्छा होती कि मी तिला M3 शिकवावं.अश्या प्रसंगी समाजात चांगली प्रतिमा जपल्याच फायदा होतो, पाटील काकूंच्या मागच्या वर्षभरात उचलेल्या बाजारच्या पिशव्याचं फळ आता मला मिळत होतं.....
तहानलेल्या माणसाजवळ विहीर नाही चक्क समुद्रच आला होता, तोही गोड्या पाण्याचा... माझा आनंद गगनातच न्हवे तर अख्या विश्वात मावत न्हवता. ती रात्र बेचैनीतच गेली, काय बोलायचं?? ती काय म्हणेल??? या विचारातच.

सकाळ उजाडली, ठरलं तर मग... एकटा जायला ऑकवर्ड वाटतंय म्हणून शुभ्याला तयार केला.
तोही विद्यार्थीच माझा त्याला हि M3 मीच शिकवलं होतं......तिला तिच्याच घरात शिकवायचा ठरलं...पाटील काका-काकू नोकरी वर त्यामुळं घरी कोणीच नाही. त्यामुळं उगाच स्ट्रेस न्हवता....

मी - (दार ठोठावत) कोणी आहे का??

ती - (दार उघडून) कोण??
तिच्या चेहऱ्यावरचा प्रश्नचिन्ह बघून मीच बोललो

मी - मी ओंकार आणि हा शुभम तुला M3 शिकवायला आलोय...

ती - ओह, ये ये...

१५ दिवस झाले हे असच सुरु होतं. एव्हाना चांगली ओळख झाली होती आमची. फारतर मीच शिकवायचो पण शुभम हि मदत करायचा, एखादा पॉईंट तो घ्यायचा. मी शिकवणार, ती शिकणार आणि शुभ्या निवांत बसणार हे आमच्या दिवसाचं समीकरणच झालं .... हळू हळू आम्ही एकत्र फिरायला सुरुवात केली, आता बागेत बाकड्यावर आमच त्रिकुट बसलेल दिसायच. गप्पा मारत निवांत.... आमची मैत्री घट्ट झाली होती ...महत्त्वाचं म्हणजे तीच M3 सुधारतय म्हणून ती खुश होती...मला तिला भेटायला मिळतय म्हणून मीही खुश... अन दिवस निवांत जातोय म्हणून शुभ्या पण खुश.... हे आता रोजच झाल .... एव्हाना सगळं शिकवून झाल होतं ...मग आपला नुसताच बागेत जाऊन बसणं ...

सुट्टी संपत आली होती आणि शुभम ला सुट्टी संपायच्या आत मामा कड जाऊन यायचा होतं म्हणून तो तिकडं गेला होता. स्नेहल हि पाटील घराण्याबरोबर इकडं तिकडं फिरण्यात दंग झाली. त्यामुळं - दिवस काही भेटणं झालं नाही. हे - दिवस म्हणजे - दशकासारखे गेले.
एव्हाना सुट्टी संपत आली, पाटील काकूंकडून कळलं कि स्नेहल सोमवारी जाणार होती .... आता माज्याजवळ दोनच दिवस ...मग शनिवार उजाडला...आज दिवसभरात काहीही करून बोलून टाकायच ठरवलं कि "तू मला फार आवडतेस "...दिवस भर भरपूर विचार करून शेवटी एक भलं मोठ्ठं पत्र लिहला ...जणू काय १६ मार्क्सच्या question उत्तरच .... एकदम डिटेल, डिस्क्रिप्टिव्ह
कोणत कारण काढून भेटायचं हा विचार करता करता संध्याकाळ झाली ...आणि एवढ्यात स्नेहलच घरी आली ...आणि बोलली "चल कि बागेत जाऊ!! "
बागेत जाऊन बसलो ...आज थोडी शांत होती ती, एरवी मजेत, हसत बोलणारी ती आज गप्प गप्प, मी पण गप्पच...कुठून सुरुवात करायची या विचारात, तेवढ्यात तीच म्हणाली "काही तरी सांगायचंय तुला ..."
मी - बोल कि

बहुदा मला जाणवला होतं कि तिला काय म्हणायचंय (एक्सपेरियन्स शेवटी), मी आनंदात होतो पण तसं काहीही दाखवता, मी त्या गावचा न्हवेच या अविर्भावात मी बोलत राहिलो. पुढं ती म्हणालीमला धाडस होत न्हवतं म्हणून पत्रात लिहून आणलंय, तू वाचशील का ते?” अस म्हणून तिनं माझ्या हातात पत्र ठेवलं ...मी पत्र उघडल आणि शांत पणे वाचायला सुरु केल...माझा आनंद दाखवता ...शक्य तेवढं सरळ वाचायला सुरु केल ...जस जस पत्रात खाली जात होतो..माझा आनंद द्विगुणीतच होत चालला होता ....शेवटी ते वाक्य आलंच "मला खूप आवडतोस रे तू "....बस्स ........येस्स.....येस्स...माझ मलाच कळायचं बंद झालं आता.पत्रातून नजर काढून तिच्याकडं पहिला तर ती इतकी सुंदर दिसत होती कि स्वर्गातील देवी देवताही तिच्या सोंदर्य पुढे नतमस्तक होतील .

त्यातच मंद वाऱ्याची झुळूक आणि मावळतीला लागलेल्या सूर्याची किरण तिच्या सौन्दर्यात निव्वळ भरच घालत होते .कधी विचार केला न्हवता कि हा सूर्यास्त माझ्या आयुष्यात नवीन सुंदर आणि तितकीच नयनरम्य पहाट घेऊन येईल ते .आता मला पत्रातील एक एक अक्षर मोत्यासारखा दिसू लागलं....ज्या बागेत फुलाचं एक हि झाड नही तिथं मला सगळ्या झाडांना गुलाबाची फुल लागलेली दिसली ...बागेतले सगळे म्हातारे म्हातारी मला त्यांच्या तारुण्यात असतानाचे  जोडपी दिसू  लागली ....बागेत सुगंध दरवळत होतं ..बहुदा कोणी तरी अगरबत्त्या आणून लावल्या असाव्यात .बागेतल्या घसरगुंडीवर मला आमचे चिंटू-पिंटू खेळताना दिसले.मी साक्षात स्वर्गाच्या दरवाज्यात उभा होतो.........
एवढ्यात मी भानावर आलो आणि पत्राच्या शेवटाकडे गेलो. "तुझीच स्नेहल " आणि पत्र संपलं. मी एक हात डाव्या खिशात घातला मी लिहलेला पत्र काढायला, तिच्याकडं पाहिलं तर ती अजूनही साशंक होती माझ्या प्रतिक्रियेवर,तीन विचारल कस वाटलं ...

मी म्हणालो.” फारच सुंदर आहे"

"मग देशील का ते शुभम ला???” ..........काय .....काय ...????

तिच्या एका वाक्यानं एकदमच  सगळं बदललं ....वेळ, काळ, नियती सगळं स्तब्ध अगदी माझ्या डोळ्यातले अश्रू हि.....मला जाणवल काय झालय ते...डोळ्यातलं पाणी आवरत सगळीकडं नजर टाकली सगळं कस बदलेल होतं...स्वर्गाचं दार ढकलून आत डोकावलं तर आत नर्क निघालं ...यम आणि चित्रगुप्त सुद्धा होते तिथं ...यम तर हसतच होता म्हणाला "अस तर कधी माझ्याबरोबर हि नाही झाला",चित्रगुप्त ज्याला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य सगळं माहिती असतं तोही तितक्याच धक्क्यात होता जितका कि मी...बहुतेक त्याला हि माहिती असावं एका वाक्यानं आयुष्यात कस वादळ येत ते ....

जो सूर्यास्त माझी प्रेमकहाणी सुरु करणार होता, तो झाला होता, पण क्षितिजापार तो इतका खोल वर बुडाला कि नजीकच्या भविष्यात सूर्योदय नाही हे सांगायला काय हवामान खात्याची गरज न्हवती ....बागेतली झाड आता कोमेजली होती..मगाशी प्रेमी युगल दिसणारे म्हातारे म्हातारी आता पार मारायला टेकली होती ...भविष्यातले चिंटू-पिंटू घसरगुंडी वरून घसरायच्या आधी...शिडीवरून घसरून पडले होते ...आता मात्र पत्रातील एक आणि एक शब्द हृदयावर वार करत होता...सप्प्प...सप्प्प...बागेतला सगळा oxygen संपला..जीव कासावीस होऊ लागला, बागेतला सुगंध नाहीसा झाला होता.
"सुगंध आणि स्वप्नातल साम्य मला उमजल, स्वप्न सुगंध देत पण स्वप्न संपलं कि सत्य बोचू लागत. अगरबत्ती हि तसच सुगंध देत राहायच. पण शेवटी दोघांची उरते ती फक्त राखच..."

पुन्हा एकदा भानावर येत मी तिच्याकडं पहिल, डाव्या खिशातल पत्र आणखीनच आत सरकवलं...जे पत्र तिच्या आनंदाश्रूंत भिजण्यासाठी लिहलं गेलं ते आता माझ्याच हृदयाच्या रक्तात हेळसांडल गेलं. मी शांत होतो .... शून्यातून नजर काढत. मी ऐकू लागलो काहीतरी बोलत होती ती...बहुतेक शुभम कसा आवडला ते सांगत होती ...पण मी ऐकत न्हवतो ...शेवटी ती म्हणाली "मी शुभमलाच देणार होते पत्र पण तो नाहीये, तू देशील का त्याला??" मी हो म्हणालो. कॉल आल्याचं कारण सांगत तिथून तडक उठून घराकडं निघालॊ. पाऊस पडावा अशी इच्छा होती...शेवटी पुरुषी अहंकाराला ठेच पोहचवता ...अश्रूंना वाट मोकळी करायचा तो एकमेव मार्ग. शेवटी शिक्षक आणि विद्यार्थी नातं स्पष्ट झालं होत. शुभ्याच एक अधिक एक बरोबर दोन, माझ्या quadratic equation वर भारी पडल होत.एकदाचा घरी पोहचलो....... कुणाच्या तरी हृदयात जाणारं पत्र थेट पाण्याच्या बंबात गेलं, ते परत कधी मिळण्यासाठीच.!!!

-       ओंकार पाटील



Comments

Anonymous said…
Good one mate! Many more to go..Keep Writing
Anonymous said…
Appreciation Thread!! Omkar ✌️✌️❤️💯
Unknown said…
Thanks shardul for.... publishing my article....thanks for generous comments..... thank you so much🙌🙌
Unknown said…
Great Post...!!👌🖤

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

ते शेवटचे दिवस

आज class मध्ये बसून पण थोड एकट एकट वाटल. मुल थोडी कमीच होती, जी होती ती आपल्याच नादात होती पण मी तिथे एकटाच होतो. आज जाणवल , शेवटचा महिना, शेवटचे ३०-४० दिवस, college मधल्या त्या वातावरणात वेळ घालवायाची शेवटेची संधी. त्या बेंच वर बसून दंगा करायचे शेवटचे दिवस . कुठे कोणाशी झालेल भांडण मिटवायच असेल किंवा अबोला सोडायचा असेल तर शेवटचे सोनेरी दिवस.  मनात थोडी भीती वाटते आज... रोज सकाळी बस मध्ये बसून college च्या stop वर उतरायची सवय मोडावी लागणार काही दिवसात. Lecture तर दूर पण त्या बदाम चौकाततरी आपल्याला कोणी ओळखेल का? मित्रांना मुक्त पणे शिव्या देत फिरण्याचे दिवस संपणार.. lipton वर दर संध्याकाळी केलेला चहा- नाश्टा परत रोज नाही मिळणार. उमेश दादाशी गप्पा मारत घालवलेले दिवस college संपल्यावर पुन्हा कधी मिळणार ? ४:१५ नंतरची classtest आणि मध्येच मुसंडी मारणार्या midsem आपण परत कधीच नाही देणार.! Ground वरच्या बेंच वर बसून केलेला timepass परत नाहीच होणार! Lunch Break मध्ये डबा खाण्याचा बेत कदाचीत नाहीच करता येणार. नीरज्याच्या डब्यातील roll, वैभव च्या डब्यातल्या चपात्या, कुलदीप ची आवडती ट...

गोष्ट

 चला, आज खूप दिवसांनी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, गोष्ट म्हणजे कोणाची गोष्ट? तर ही गोष्ट आहे ती आहे एक घराची.  बेंगलोर मध्ये नव्याने नवीन भागात राहायला आल्यावर येताना जाताना दिसणारे एक छोटंसं जून घर. ज्या पाणीपुरी वाल्याकडे पाणीपुरी खायला जातो त्याच्या दुकानासमोर असलेलं. पाणीपुरी खात खात मी पाहात होतो की, ती जुनी घर असतात ना, तळमजल्यावर दुकान आणि वरती रहण्याजोग्या २-३ खोल्या, छप्पर शक्यतो पत्र्याच असतं बघा तसच हे घर. खाली किरणामालाच आणि सोबतच झेरॉक्स च दुकान आणि दुकानाची भिंत संपली की लागूनच वरती जायला जिना. ते बघता क्षणी माझ्या डोक्यात प्रश्न आला की कशी असेल ही छोटीशी इमारत ती उभी राहिली त्या वर्षात?  नवीन रंग असेल चमकत असेल कदाचित भागामध्ये हीच सुंदर दिसणारी एकुलती एक असेल बहुतेक. आजूबाजूच्या कॉलेज मधल्या विद्यार्थिनी किंवा नवीन बिऱ्हाड करणारे प्रोफेसर? किंवा एका खोलीत एक आणि एका खोलीत एक अशी दोन बिऱ्हाड? मुख्य रस्त्यावरच असल्यामुळे भाडे ही बक्कळ मिळत असेलच मालकाला मग नक्की हे आता बंद का, की फक्त मला बंद वाटतंय लांबून? कदाचित असेल कोणीतरी राहत तिथे असा विचार करत करत ...

Social Media