Skip to main content

घर-सुख

रोजची दगदग, बारा बारा तास Office आणि त्यानंतर रस्त्यावरच ते जीवघेण ट्राफिक, सगळ सगळ अगदी कंटाळवाण आणि अश्यातच एक मोठी सुट्टी मिळण म्हणजे स्वर्गाला दोन बोट कमी!
मनात चार दिवस आधीपासूनच चालू असलेली उत्सुकता आणि चेहऱ्यावरून न लपणारी पण ओसंडून वाहणारी excitement ह्या सगळ्यात तो शेवटी दिवस येतोच,
booking झाल असल्यामुळे आपण लीड ला आगाउ कल्पना देउन लवकर निघतोच आणि आधिच भरलेल्या Bag ला पाठीला लटकवून बस मधे चढतो,
बस मधे चढताच मनात चालू झालेली घालमेल, आणि आजुबाजुला मराठी लोकांचे आवाज, सुखकर वाटतात आणि सहा महिन्याच्या स्वल्पविरामानंतर घराकडे कूच केली जाते. रात्री झोप सुद्धा व्यवस्थित लागत नाही कारण समोर घर दिसत असत.
पोटभरून आनंद झालेला असतो आणि आता waiting असत ते बस गावात पोचण्याच.
घरापर्यंत पोचल्यावर घरात पाऊल ठेवायच्या आधी आपल्या मायभुमीच्या स्पर्शाने सर्वांग शहारून जात, सगळा ताण विसरून मन त्या ओळखीच्या अल्हाददायक हवेत रममाण होत.
घराजवळ बाबानी लावलेली फुलझाडांची बाग आपलीच वाट बघत होती असाच भास होतो, मोगरा आपला सुगंध माझ्या नाकांपर्यंत पोचवायला त्याचे पंचप्राण लावतो पण बकुळीचा वृक्ष आपल्या सुगंधाने त्या सर्वाना मागे सारतो.
घराबाहेर पारंपारिक पण नीट जपलेला तो कडीपाट (झोपाळा) दिसतो आणि त्याच्यावर बसण्याचा मोह न आवरल्याने मी पळत जाऊन त्याच्यावर बसतो. कोण आल म्हणून आई बाहेर येते आणि आधी काहीच कल्पना नसल्याने आश्चर्यचकीत होऊन मला मिठीच मारते.
बाहेर काम आणि बाकीच्या व्यापात कीतीही त्रास असला तरी हेच एक ठिकाण आहे जिथे सगळ विसरायला होत.
बाहेर कितीही महाग आणि branded पाणी प्या पण ते घरच माठातल पाणी असत ना 'तहान' त्यानेच भागते. ते पाणी फक्त शरीराचीच नाही अगदी आत्म्याची सुद्धा तहान भागवते.
आता इथून पुढे १ आठवडा इथेच अस म्हणून मी हॉल मधल्या दिवाणावर अंग टाकतो आणि गाढ झोप एक निमिषार्धात लागते.
दुपार उत्तरार्धाकडे वळू लागली  म्हणजे ४-५ वाजायला लागले की जाग आपोआप येते आणि बहिणीने केलेला तो कडक चहा उरली सुरली झोप पळवून लावतो. मोबाईलकडे लक्ष जात आणि call नेहमीच्याच त्या एका मित्राला जातो, दोघे मिळून मग बहे बेटावरचा मारुती आणि नरसिंहपूर करायला गावाच्या बाहेर.
बह्याचा पूल ओलांडतानाच कृष्णामाई हात पसरून स्वागत करते आणि नरसिंहपूर ला मिळणारी मन:शांती मन शुद्ध करून टाकते.
परत येता येता मारुतीच दर्शन आणि बहे बेटावरच्या सुर्यास्ताच्या विहंगम दृष्याची ओढ पूल उतरायला भाग पाडते, कृष्णेत पाय सोडून आणि यतेच्छ फोटो काढून वेळ जातो तेवढ्यात सुर्यास्ताचा तो patented फोटो.
घरी परत येतोन येतो तोच गावातल्या सगळ्या मित्राना माझ्या येण्याची खबर पोचलेली असतेच, सगळे एकदम फोन करून बोलवतात आणि अर्ध्या वर्षाच्या काळानंतर मुलगा घरी आलेला, घरातले घराबाहेर सोडायला तयार नसतात.
अश्याच वेळी रात्रिच्या त्या Family Dinner नंतर सगळे गप्पा मारत बसतात आणि तेव्हा मी बाबाना त्यांच्यासाठी घेतलेला मोबाईल देतो!
मुलाच्या कमाईतून मुलाने काहीतरी आपल्याला दिलय ह्याच आनंदात बाबा माझ्याकडे कटाक्ष टाकतात आणि नेहमीचा तोच प्रश्न विचारतात, "कितीला बसला?"
पण खर सांगू का ह्या अश्याच छोट्या छोट्या गोष्टींची किंमत होत नसते, बाजारातल्या चलनाला आणि बाबांच्या डोळ्यात दिसणाऱ्या त्या भावनेला एक दुसर्याची बरोबरी करण्याची लालसाच बसते.
दुपारी एवढी झोप काढून सुद्धा, रात्री अगदी १०-११ च्या सुमारासच जुन्या नेहमीच्या उबदार गोढडीत झोप लागते आणि खर सांगतो एक स्वप्न देखील पडत नाही.
सकाळी उठल्या उठल्या आई चा प्रश्न असतोच "नाष्ट्याला काय करू दे?" मी हसतो आणि "काहीही कर" अस सांगतो. काहीही चा अर्थ आईला चटकन समजतो आणि क्वचितच बेंगलोर मध्ये मिळणारा तो गोडाचा सांजा डिश मध्ये हजर असतो.
ह्या ८ दिवसाच्या सुट्टी मध्ये घरातल जेवण अगदी पोट भरून खाल्ल जात आणि तरीसुद्धा आपल पोट अजून सुटतय का काय म्हणून डोक्यात एकही किडा वळवळत नाही.
सगळे जवळ लांबचे पाहुणे, जवळचे आणि ज्याना आवर्जून भेटाव असे मित्र, ज्या देवांच दर्शन तिकडे होत नाही असे देव आणि गावातल्या उत्कृष्ट आणि जगात भारी अश्या हॉटेल मधल जेवण. हे सगळ मनसोक्त जगत असताना शेवटचा दिवस येतो आणि उद्या Office मध्ये हजर व्हायच म्हणून तिकीट बूक होत.
खूप दिवस राहिलो असा विचार मनात येतो आणि पाहुण्यासारख आपलच घर सोडून परतीला लागाव लागत.
आई ने दिलेल्या चकल्या, लाडू, आणि घरची तयार केलेली चटणू बॅगेत स्वतःहून जाऊन बसते आणि कपड्यांची जागा अलगद अडवून जाते. कपडे इस्त्री करून बॅगेत जातात आणि एखादा शर्ट किंवा जॅकेट जास्तीच होऊन बसतात. उद्यापासून पुन्हा ऱूटीन चालू म्हणून डोक्यात आता "Task for Today" चा मेल दिसू लागतो आणि वेळेपुर्वीच कर्मभूमीकडे प्रयाण करायला जीव जड वाटायला लागतो.
माझ घर, माझ गाव, आमचा चौक, माझी शाळा, माझी आई, माझे बाबा, माझी बहीण, किंबहूना माझे 'सगळेच' पुन्हा एकदा पाठीमागे ठेवून मी घराबाहेर पडतो.
"परत कधी रे आता?" आई आणि बाबांचा हा प्रश्न अनुत्तरित ठेवून फक्त "लवकरच" अस म्हणत मी निघतो.

Comments

Unknown said…
Simply awesome...👌😍
Unknown said…
Rula diya yaar... 😅😍
Thank you!! 😊 Keep Reading!
नेहा said…
निशब्द. ....दाद्या आला की घर भरत....आणी बेंगलोर ला जाणार म्हंटल की अस वाटत का मुल मोठी होतात...
Akash Munde said…
Superb खूपच छान
Thank you Akash! Keep Reading! 😊
Unknown said…
Dolynt pani al.. Khup chan 👌
Aniket chavan said…
लय भारी!
Khup chhan...
Apratim lihilay
Thank you so much all! Keep Reading!! 😊
Anonymous said…
Sorry yaar...bhetlo nahi...

Farach sunder lekh....farach...

Ani ha... नाही सुटणार पोट आता...त्यानं extreme limits reach kelay already. Hahahaha
Priyanka Gotkhinde said…
Very nice Shardul .. literally radval tu .. will miss you.. god bless
Thank you All!!
Keep Reading! Keep motivating!
Be PharmaWise said…
Khupach Chan Shardul... Lihit Raha...

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

माणूस ओळखायचं गणित

 काहीतरी चुकतंय. माणूस ओळखायला? की माणूस जाणून घ्यायला? कुठेतरी काहीतरी हरवतेय,  मनाच्या कोपऱ्यात शंकांचं काहूर माजतय आणि सैरभैर होऊन चित्त थळ्यावरून हल्लय. काहीच सुचत नाही, कोण कसे आणि कोण कसे... नक्की ओळखायचं तरी कसं? पारखायच कसं की भेटणारा रोज बोलणारा आपला म्हणायचा तो माणूस आपलाच का? काहीतरी वेगळं पाहिजे ना? वेगळी नीती, वेगळी पद्धत? माणसं ओळखायची?? एक टूलकिट वगैरे सारखं म्हणजे कसं माणसं ओळखता येतील. कोणीतरी पुढे येऊन ये करायला पाहिजे, एक पद्धत बनवून सगळ्यांचच कल्याण केलं पाहिजे. कधी कधी कोड च पडत की हा समोर बसलेला माणूस जो आपल्याशी प्रेमाने बोलतोय, आपल्या जवळ येतोय तो नक्की मनातून आपलाच विचार करतोय का? आपल्याच भल्याचा विचार करतोय की फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतोय? कुठून येतं ते तंत्र जिथे माणसं ओळखायची कला अवगत होती? "बघितल्या बघितल्या मी ओळखलं होत, हा किंवा ही कशी आहे ते" हे बघितल्या बघितल्या ओळखायचं skill येतं कुठून? आणि कसं शिकायचं?  मला पण शिकायचंय, माणसं ओळखायला आणि जश्यास तस वागायला, परिस्थिती बघून पलटी मारणाऱ्या आणि नको तेव्हा इगो मोठा करून फुगून बसणाऱ्या, आ...

लिहितात नक्की कसं?

 काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं. एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत. खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं? कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल? म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही. हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे. आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो ...

Social Media