रात्री १२ वाजता Office मधून निघाल्यानंतर मनात एक प्रचंड काळोख निर्माण होतो, लख्ख उजेडातून मंद प्रकाशाच्या खोलीत अचानक गेल्यावर जस आपल्याला काहीच दिसत नाही ना अगदी तसा!
आपण का करतोय एवढ काम? आणि काय मिळवतोय एवढ काम करून? पगार? पण पगार तर ९ तासाचा मिळतो! १४ तासाचा नाही !!!
Gate मधून बाहेर गाडी पडल्यावर एवढ्या मध्यरात्री समोर असलेल traffic दिसल आणि मनातल्या अंधारात एक छोटी मिणमीणती पणती असल्याचा भास झाला...
मी एकटाच नव्हतो एवढ्या रात्री घरी जाणारा! माझ्यासारखे अनेक होते की जे एवढ्या रात्री आपल दिवसाच काम संपवून घरी जात होते!
मग प्रश्न पडला, ते बिचारे आहेत की मी? का दोघेही समदु:खी? खरच गरज असते का एवढ काम करायची? कॉलेज मध्ये असताना संध्याकाळी घरी जायचो,
ती संध्याकाळ आता कुठे गेली? हरवली का ती?
मनात फक्त हेच विचार चालू असतात आणि Flat वर पोचेपर्यंत मी पक्क ठरवतो की उद्या लवकर बाहेर पडायच, आणि संंध्याकाळी त्या रसगंगा मध्ये जाउन चहा प्यायचा! लवकर यायच तर मग लवकर जायला पाहीजे,
लवकर उठलो, आवरून गेलो पण तुम्हाला माहीती आहे का? तो एक लूप आहे, रोज तिथे गेल्यावर brainwash होतोच आणि पुन्हा मला निघायला रात्रीचे १२ वाजतात!
Comments