कविता,
कविता ही भावना असते.
कविता ही वासना असते,
चार ओळींची का असेना पण ती कविता असते.
कविता नाव असते, कविता स्थान असते,
कविता कवीच्या अस्मितेचे भान असते.
कविता आभास असते,
त्यात थोडी अडचण पण पुढे मोकळीक असते.
कवीच्या मनातल्या फुलांची ती बाग असते.
त्यात झाडे असतात , गावात असते,
फुलपाखरुही इकडून तिकडून फिरत असते पण,
पण त्या बागेत माळी नसतो; किंबहुना त्या बागेला
माळ्याची गरजही नसते,
ती जन्मतःच सुंदर असते....
कधी कविता थोडी मऊ असते
कधी हिरवी मिरची लागते,
कधीतरी मोकळा श्वास वाटते, तर कधी विचित्र बंधन
वाटते.
कधी कधी ती प्रेमाची पण असते,
प्रेमक्रीडेचे ते मैदानच असते,
कधीतरी त्याच्यासाठी तर कधीतरी तिच्यासाठी,
कविता फक्त मधला दुवा असते.
निळ्या
निळ्या आभाळाखाली ज्याला ती सुचत
जाते....
त्याची मनापासून धन्यता वाटते...
Comments